Mobile Passport Service Camp | पुणे येथील रावेत भागातील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालयामध्ये फिरते पारपत्र सेवा शिबीर
पुणे : प्रादेशिक पारपत्र कार्यालय (आरपीओ) पुणे यांच्यामार्फत येत्या 28, 29 आणि 30 जानेवारी 2026 रोजी पुणे येथील रावेत भागातील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालयामध्ये येथे पासपोर्ट म्हणजेच पारपत्र सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या पासपोर्ट भेटीची – ‘अपॉइंटमेंट’ तारीख लवकर उपलब्ध करून देण्याच्या आणि पारपत्र सेवांची शेवटच्या टप्प्यापर्यंतची सेवा सुधारण्याच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
संबंधित मंडळींनी कागदपत्रे ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी प्रौढ आणि अल्पवयीन अर्जदारांसाठी दिलेल्या ‘चेकलिस्ट’- तपासणी सूची काळजीपूर्वक वाचावी.
[अर्जदाराची सत्यता तपासण्यासाठी, पारपत्र अधिनियम 1967 च्या कलम 5 नुसार, पारपत्र नियम, 1980 च्या नियम 5 सह, पासपोर्ट प्राधिकरण सर्व आवश्यक चौकशी करू शकते आणि अर्जाच्या योग्य निकाली काढण्यासाठी पासपोर्ट प्राधिकरणाला आवश्यक वाटेल.अर्जदाराला अशी अतिरिक्त माहिती, कागदपत्रे सादर करण्यास सांगू शकते, ]फिरत्या पारपत्र केंद्राची भेटीची वेळ कशी निश्चित करावी ते जाणून घ्यावे :
i. पासपोर्ट इंडिया वेबसाइटला (https://www.passportindia.gov.in) भेट द्या आणि ‘नॉर्मल’ योजनेअंतर्गत अर्ज सादर करा.
ii. ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर, ‘शेड्यूल अपॉइंटमेंट पेज’वर जा, ‘मोबाईल व्हॅन’ हे ठिकाण निवडा आणि भेटीची वेळ निश्चित करा.
पारपत्र फिरते सेवा केंद्र उपलब्धतेची तारीख आणि ठिकाणाचा तपशील:
i. दिनांक: 28, 29 और 30 जनवरी 2026
ii.ठिकाण: पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालय, रावेत, पुणे, प्लॉट नंबर बी , सेक्टर नंबर 110 (1) (2) (3), लक्ष्मीनगर रावेत, हवेली पुणे 412101.
iii.वेळ: 08.30 ते सायंकाळी 6.00 (अर्जदारांनी ऑनलाइन अर्जाच्या पावतीवर नमूद केलेल्या त्यांच्या नियोजित वेळेच्या 15 मिनिटे आधी उपस्थित राहावे)
