Mobile Phones Ban In Polling Stations | मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या आवारात मोबाईल नेण्यास प्रतिबंध

Mobile Phones Ban

पुणे : Mobile Phones Ban In Polling Stations | विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आवारात मतदान केंद्र अध्यक्ष, सूक्ष्म निरीक्षक वगळता उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी, मतदार आदींना मोबाईल नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मतदान केंद्रावर मोबाईल सापडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती चिंचवड विधानसभा (Chinchwad Assembly) मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार (Anil Pawar Election Officer) यांनी दिली आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात ५६४ मतदान केंद्रे असून मतदारसंघात ६ लाख ६३ हजार ६२२ मतदार आहेत. यामध्ये ३ लाख ४८ हजार ४५० पुरुष, ३ लाख १५ हजार ११५ महिला, तर ५७ तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे. या मतदान केंद्रावर छायाचित्रीकरण करण्यास बंदी असून मोबाईल, स्मार्टफोन, स्मार्टवॉच, वायरलेस सेट यासह इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेण्यास सक्त मनाई आहे.

मतदानाच्या दिवशी अनावधानाने एखाद्या मतदाराने मतदान करण्यासाठी मोबाईल सोबत आणल्यास तो मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या अंतरावर ठेवावा लागेल. सर्व उमेदवार आणि मतदारांनी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शन सूचनांचे पालन करावे असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Police Tadipari Action | येरवडा परिसरातील 4 सराईत गुन्हेगार तडीपार ! पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केली कारवाई

Maharashtra Assembly Election 2024 | दहा हजाराहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्र इमारतींच्या ठिकाणी वाहन तळासाठी अतिरिक्त क्षेत्र उपलब्ध

Policeman Suicide News | तणावग्रस्त पोलीस कर्मचाऱ्यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या; पोलीस दलात खळबळ

Maharashtra Assembly Election 2024 | मतदानासाठी मतदार ओळखपत्र नसल्यास ‘हे’ 12 प्रकारचे पुरावे ग्राह्य; मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी

Indapur Assembly Election 2024 | ‘दत्तात्रय भरणे सारख्या गद्दाराला पाडण्यासाठी पूर्ण ताकतीने काम करा’, जयंत पाटील यांचे इंदापूरमध्ये आवाहन

You may have missed