Model Sukhpreet Kaur | 19 वर्षीय मॉडेलने पंख्याला गळफास घेत संपवलं जीवन; स्पर्धा, मानसिक आरोग्य आणि एकटेपणामुळे टोकाचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती

गुजरात: Model Sukhpreet Kaur | १९ वर्षीय मॉडेलचा मृतदेह तिच्या भाड्याच्या खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. सुखप्रीत कौर असे १९ वर्षीय मॉडेलचे नाव आहे. सुखप्रीत ही मूळची मध्य प्रदेशची रहिवासी असून, काही दिवसांपूर्वीच मॉडेलिंगच्या प्रोजेक्टसाठी सूरतमध्ये आली होती.
सुखप्रीत ही सूरतच्या सरोली भागातील कुंभारिया गावात असलेल्या सारथी रेसिडेन्सीमध्ये तीन मैत्रिणींसोबत भाड्याने राहत होती. शनिवारी संध्याकाळी तिच्या रूममेटपैकी एक घरी परतल्यावर तिला सुखप्रीतचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्यानंतर तिने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह याब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.
अधिक माहितीनुसार, सुखप्रीत घटनेच्या वेळी घरात एकटीच होती. तिच्या रूममेट्स त्यावेळी बाहेर गेल्या होत्या. पोलिसांनी तिचा मोबाईल फोन जप्त करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे. तसेच, तिच्या रूममेट्सचीही चौकशी सुरू आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा वाद होता का, हे स्पष्ट होऊ शकेल. सध्या पोलिसांनी आत्महत्येचा संशय व्यक्त केला आहे, परंतु पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट आढळलेली नाही.
ही घटना मॉडेलिंग क्षेत्रातील स्पर्धा, मानसिक आरोग्य आणि एकटेपणाच्या समस्यांमुळे झाले असल्याचे बोलण्यात येत आहे. पोलिसांनी सर्व अंगांनी तपास सुरू केला असून, कॉल डिटेल्स, सोशल मीडिया इंटरॅक्शन आणि परिवाराचीही चौकशी केली जात आहे.