Mogara Fulala News | सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा ‘मोगरा फुलला’सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न; आमदार बापूसाहेब पठारे, नगरसेवक सुरेंद्र पठारे, नगरसेविका ऐश्वर्या पठारे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन

Mogara Fulala News | Directorate of Cultural Affairs' 'Mogara Fulala' cultural program concluded; Lamp lighting by MLA Bapusaheb Pathare, Corporator Surendra Pathare, Corporator Aishwarya Pathare

पुणे: Mogara Fulala News |  राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, सांस्कृतिक सचिव किरण कुलकर्णी व सांस्कृतिक संचालक श्रीराम पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्य संचालनालयांच्यावतीने विमाननगर येथील सिम्बॉयसिस ऑडिटोरियममध्ये ‘मोगरा फुलला’विशेष सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला पुणेकर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी आमदार बापूसाहेब पठारे, नगरसेवक सुरेंद्र पठारे, नगरसेविका ऐश्वर्या पठारे, ज्येष्ठ नागरिक दिलीप पवार आणि मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण दादा पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने अधीक्षक जानवी जानकर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत केले.

या सोहळ्यात गणेश शिंदे यांनी ‘मोगरा फुलला’ हे सादरीकरण सादर केले. अभ्यासपूर्ण निवेदन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या बहारदार सादरीकरणाने संपूर्ण सभागृह भक्तिमय झाले होते. संत साहित्यावर आधारित या कार्यक्रमाने उपस्थित रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णाई उळेकर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले, तर कार्यक्रमाच्या शेवटी जानवी जानकर यांनी सर्वांचे आभार मानले.

You may have missed