Mohol Solapur Crime News | आईच्या व्यायामासाठी तयार केलेल्या दोरीचा गळफास बसून शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Mohol Solapur Crime

सोलापूर : Mohol Solapur Crime News | आईच्या व्यायामासाठी तयार केलेल्या दोरीचा गळफास बसून एका शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हर्षवर्धन विनायक इंगळे (वय-१५) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. हर्षवर्धन इयत्ता दहावीत शिकत होता. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात (Mohol Police) करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत हर्षवर्धनच्या आईला अर्धांगवायूचा आजार झाला आहे. डॉक्टरांनी त्यांना व्यायामाचा सल्ला दिला होता. व्यायामाने आईला लवकर बरे वाटावे म्हणून घराच्या पत्र्याच्या अँगलला एक दोरी बांधून तिला लोखंडी सळईचा त्रिकोणी अँगल बनविला होता व त्याला मूठ लावलेली होती. त्याद्वारे आईचा व्यायाम सुरू होता.

दरम्यान, आईकडे जाताना घरात अंधार होता. त्यामुळे हर्षवर्धनला ती लोंबकळत असलेली दोरी दिसली नाही. त्यामुळे तो तसाच पुढे गेला असता सदर दोरीचा हर्षवर्धनच्या गळ्याला फास लागून त्यात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एन एन आतकरे (API N N Atkare) करीत आहेत. (Mohol Solapur Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MNS On High Security Number Plate | सरकारने वाहन चालकांकडून खंडणी वसुलीसाठी वापरल्या जाणाऱ्या
‘एच डी नंबर प्लेट’ सक्तीचा फेरविचार करावा; ‘मनसे’ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Kothrud Pune Crime News | शाळेत जातो, असे सांगून 10 वर्षीय मुले घराबाहेर पडली,
घरी न परतल्याने कुटुंबीयांची धावाधाव, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

You may have missed