Monsoon Weather Update | राज्यात ऑगस्टची सुरुवातच अतिवृष्टीने होणार; हवामान विभागाकडून महत्वाचा इशारा

Rain

पुणे : Monsoon Weather Update | राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. ऑगस्टची सुरुवातच पावसाने होणार आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राला १ ते ३ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून विदर्भाला यलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र मराठवाड्यातील काही भाग वगळता बहुतांश भागात कमी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Heavy Rain Warning)

जुलै महिन्यात मराठवाडा वगळता सर्वत्र चांगला पाऊस झाला. तसाच पाऊस ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. या पावसाला ३१ जुलै पासून सुरुवात होणार आहे. प्रामुख्याने कोकण व मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यात कोकणसह पुणे, कोल्हापूर घाटमाथ्याला हा इशारा दिला आहे. (Monsoon Weather Update)

३१ जुलै ते ३ ऑगस्ट पर्यंतचे अलर्ट जाणून घ्या…

ऑरेंज अलर्ट – ठाणे ( ३ ), रायगड ( १ ते ३ ), रत्नागिरी ( १ ते ३ ), सिंधुदुर्ग ( २, ३ ), पुणे ( १ ते ३ ), कोल्हापूर ( १ ते ३ ), सातारा ( १ ते ३ ), चंद्रपूर ( २ ), गडचिरोली ( २ ), गोंदिया ( २ ), नाशिक ( ३ ).

यलो अलर्ट – ठाणे ( ३१.१. २ ), मुंबई ( १ ते ३ ), सिंधुदुर्ग ( १ ). धुळे, नंदुरबार, जळगाव ( ३ ), नाशिक ( २ ). पुणे ( ३१ ), कोल्हापूर ( ३ ), सातारा ( ३१ ), छत्रपती संभाजीनगर ( ३ ), जालना ( २, ३ ), परभणी ( ३ ), हिंगोली ( २, ३ ), नांदेड ( २, ३ ), लातूर ( ३ ), अकोला ( ३१, १, २, ३).

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Police News | घरातून रागाच्या भरात निघून गेलेला अल्पवयीन मुलगा सापडला जबलपूरला !
रेल्वे स्टेशनला विकत होता पाण्याच्या बाटल्या, पोलीस आयुक्तांकडून 5 लाखांचे बक्षीस जाहीर

Pune Police Inspector Transfers | पुणे शहरातील 20 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; जाणून घ्या कोणाची कोठे झाली बदली

Eknath Shinde On Uddhav Thackeray | “मराठा आरक्षणाचा चेंडू मोदींच्या कोर्टात टाकून…”
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले, “दोन समाजामध्ये भांडणे …”

UBS Securities Issue Public Notice | शेयर बाजारात फसवणूक करणार्‍यांपासून सावधान!
ब्रोकरेज फर्मकडून बहुरूप्यांची पोलखोल, पैसे लावण्यापूर्वी करा 100 वेळा विचार

You may have missed