MPSC Exam – Disabilities Verification | MPSC मध्येही मोठ्या घोटाळ्याची शक्यता ! निवड झालेल्यांचे टेन्शन वाढले, प्रमाणपत्र पडताळणीसाठी 8 उमेदवारांना सोशल मीडियावरून आदेश

पुणे : MPSC Exam – Disabilities Verification | आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Puja Khedkar) हिने युपीएससी परीक्षा देताना केलेल्या गैरप्रकारांचे प्रकरण सध्या राज्यासह देशात गाजत आहे. या प्रकरणानंतर स्पर्धा परीक्षा देताना बनावट कागदपत्रे (Fake Documents) वापरल्याची इतरही प्रकरणे समोर येत असून आता एमपीएससी परीक्षेत देखील मोठा घोळ झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण, एमपीएससीच्या ८ दिव्यांग उमेदवारांना प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी हजर राहण्याचे आदेश सोशल मीडियावरून देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. (MPSC Exam – Disabilities Verification)
https://x.com/mpsc_office/status/1816715911518154955?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1816715911518154955%7Ctwgr%5E20914aca382c18a601dfc65f3006a26e34d70995%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fmaharashtra%2Fias-pooja-khedkar-upsc-exam-mpsc-mat-mumbai-rajya-seva-mains-exam-2022-8-candidates-with-disabilities-verification-of-their-certificates-aam93
एमपीएससीने एक्सवर यासंबंधी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ मधील ८ दिव्यांग उमेदवारांनी त्यांच्या प्रमाणपत्रांच्या पडताळणीकरीता संबंधित अपिलीय प्राधिकरण कार्यालयात २९ जुलै रोजी सकाळी ११ वा. उपस्थित रहावे.
या पोस्टसोबतच्या पत्रात म्हटले आहे की, २०२२ मध्ये राज्यसेवेची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या ८ दिव्यांग उमेदवारांच्या कागदपत्रांबाबत तक्रारी आल्या आहे. त्यामुळे पुढील कायदेशीर लढाई टाळण्यासाठी आताच त्यांच्या कागदपत्रांची पाडताळणी करावी.
पूजा खेडकर प्रकरण समोर आणणारा वैभव कोकाट याने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले होते की, युपीएससी प्रमाणेच एमपीएससी मध्येही दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा घोळ झाला असल्याची शक्यता आहे. या पोस्टनंतर सर्वत्र खळबळ उडाली. यानंतर मॅटच्या आदेशाने एमपीएससीने निवड झालेल्या ८ उमेदवारांना चौकशीसाठी बोलावले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | बँकेच्या एटीएम मशीनमधील रोकड नेली चोरुन; चावीने एटीएम उघडून केली चोरी
Pune Court Crime News | पोटच्या मुलाच्या खुन केल्या प्रकरणी पित्याची निर्दोष मुक्तता