MSRDC News | ससूनच्या रस्ते महामंडळाची जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव; कवडीमोल भावाने विक्री? जाणून घ्या

Prime Plot In Mangalwar Peth

पुणे : MSRDC News | ससून रुग्णालयाचे (Sassoon Hospital) आधुनिकीकरण करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाच्या जागेत कर्करोग रुग्णालय उभारण्याचे आदेश अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले होते. त्या संदर्भात ससून रुग्णालय, प्रशासनाने आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने कार्यवाही देखील सुरू केली होती. (Pune News)

मात्र आता कर्करोगाच्या रुग्णालयासाठी प्रस्तावित असलेली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची पाचशे कोटी रुपयांहून अधिक किंमतीची असलेली सव्वा दोन एकर जागा अवघ्या ६० कोटी रुपयांमध्ये बिल्डरच्या (Builders In Pune) घशात घालण्याचा डाव आखण्यात आला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वतः याला विरोध केला असून जागेच्या बदल्यात मिळणारे ६० कोटी रुपये स्वतः देण्याची तयारी दर्शवली आहे. याठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यालयं असून त्यापैकी एका कार्यालयात भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे स्मारक असून विश्वेश्वरय्या त्यांच्या हयातीत पुण्यात असताना ते इथून त्यांचे कामकाज पाहायचे.

मात्र एन जी व्हेंचर्स या खाजगी बिल्डरला ही जागा द्यायचं रस्ते विकास महामंडळाने ठरवलं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची ही सव्वा दोन एकर जागा २६ वर्षांपूर्वी रस्ते विकास महामंडळाला भाडेतत्वार देण्यात आली होती.

या जागेवर सार्वजनिक बांधकाम विभागाची अनके कार्यालयं अनेक वर्षांपासून काम करत असून उरलेल्या जागेत कॅन्सर रुग्णांसाठीचा स्वतंत्र विभाग सुरु करण्याचा प्रस्ताव आहे.

मात्र शेकडो कोटी रुपयांची ही जागा खाजगी बिल्डरच्या घशात घालण्याचा हा डाव आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या अभियंत्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे
मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली असता आपल्याला याबाबत काही माहितीच नसल्याचं उत्तर त्यांनी दिलं आहे.
तर रस्ते विकास महामंडळाचे मंत्री दादा भुसे या अभियंत्यांना अद्याप भेटलेलेलच नाहीत अशी माहिती आहे.

ससून रुग्णालयासमोरील मोक्याच्या ठिकाणी असेलेली प्रशस्त सव्वादोन एकरची जागा रस्ते विकास महामंडळाने
निधी उभारणीच्या नावाखाली कवडीमोल दराने खासगी बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट घातल्याचं दिसून येत आहे.
केवळ ६० कोटी रुपयांच्या बदल्यात तब्बल ९९ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर ही जागा देण्यात येत आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chandrakant Patil | बाणेर-बालेवाडी- पाषाणमधील समस्यांसंदर्भात चंद्रकांत पाटील यांची आयुक्तांसोबत बैठक

Sanjay Rathod News | मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत?; भूखंड आपल्याच संस्थेला मिळवून दिल्याचा आरोप

Pune Pimpri Chinchwad Crime News | पत्नीला गाडीवर पाहून पतीने मित्राची केली भर रस्त्यात धुलाई; कारण मात्र होते वेगळेच

Pune Ganeshotsav | गणेश मंडळाला 100 वॉटपेक्षा जास्त क्षमतेचे ध्वनिक्षेपक वापरण्यास मनाई; ढोल-ताशा पथकावरही निर्बंध

Viman Nagar Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद