MSRTC Recruitment | नोकरीची सुवर्णसंधी! महाराष्ट्र राज्य परिवहन विभागांतर्गत 208 जागांची भरती, कोणत्या पदांसाठी किती जागा? जाणून घ्या

MSRTC Recruitment

मुंबई: MSRTC Recruitment | राज्यातील विधानसभा निवडणुकापार पडल्यानंतर आदर्श आचारसंहिता देखील शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे, आता भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन विभागांतर्गतही कर्मचारी व विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येते. दरम्यान राज्य मार्ग परिवहन विभागाच्या यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी विभागीय कार्यालयात २०८ शिकाऊ उमेदवारांसाठी भरतीची जाहिरात निघाली आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ अंतर्गत शिकाऊ उमेदवार (महिला / पुरुष) पदांच्या एकूण २०८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ डिसेंबर २०२४ आहे.

कोणत्या पदांसाठी किती जागा खालीलप्रमाणे:

यामध्ये ७५ मोटर मेकॅनिक, ३० शिटमेटल, ३४ डिझेल मेकॅनिक, ३० मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रीकल अँड इलेक्ट्रॉनिक, २० वेल्डर, १२ रेफ्रीजरेशन अँड एअर कंडिशनर रिपेअर, २ टर्नर, ५ पेंटर जनरल या पदांचा समावेश आहे.

वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता १० वी पास आहे. तर वयोमर्यादा १८-३३ वर्षे अशी आहे. अर्ज करण्यासाठीचे शुल्क इतर सर्व उमेदवारांसाठी ५९० रुपये तर एस सी?एसटी /PwBD या उमेदवारांसाठी २९५ एवढे शुल्क आकारले जाणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी https://msrtc.maharashtra.gov.in ही अधिकृत वेबसाईट देण्यात आली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar News | सत्तास्थापनेच्या दिरंगाईवरून शरद पवारांची टीका; म्हणाले – ‘…
हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय’

PMC Property Tax | समाविष्ट गावांतील मिळकत कर थकबाकी वसुलीला स्थगिती ! मात्र,
जुन्या हद्दीतील थकबाकी वसुलीसाठी एक डिसेंबरपासून बँड पथक

Sinhagad Road Pune Crime News | पुणे: इस्टेट एजंटचा निर्घुण खुन करणाऱ्या चौघांच्या
हवेली पोलिसांनी मुसक्या आवळल्या (Video)

Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्‍वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू

Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी

Rohidas Gavde-Varsha Patole | सैन्यदलातून सेवानिवृत्तीनंतर शासनाच्या सेवेत आलेल्या रोहिदास गावडे
यांचे योगदान प्रेरणादायी – उपसंचालक वर्षा पाटोळे

You may have missed