Mukund Nagar Pune Crime News | हेअर स्पावर डिस्काऊंट देण्याचे आमिष दाखवून युवतीचा विनयभंग; मुकुंदनगरमधील लॅप ऑफ लक्झरी पार्लरमधील घटना
पुणे : Mukund Nagar Pune Crime News | हेअर स्पावर डिस्काऊंट देतो, असे आमिष दाखवून स्पामध्ये बोलावून एका युवतीचा विनयभंग (Molestation Case) करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Mukund Nagar Pune Crime News)
या प्रकरणी १९ वर्षाच्या युवतीने स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अली नजाकत शेख Ali Nazakat Shaikh (वय २७, रा. चिंतामणीनगर, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मुकुंदनगरमधील लॅप ऑफ लक्झरी या पार्लरमध्ये रविवारी सायंकाळी पावणेसात वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या लॅप ऑफ लक्झुरी या पार्लरमध्ये जात असत. आरोपी याने फिर्यादीशी ओळख वाढविली. रविवारी त्या पार्लरमध्ये गेल्या होत्या. तेथून परत आल्यावर अली शेख याने हेअर स्पावर डिस्काऊंट देतो, असे आमिष दाखवून फिर्यादी यांना परत पार्लरमध्ये बोलावले. केसंची ट्रिटमेंट करीत असताना फिर्यादी यांना पार्लरमधील आतल्या खोलीत नेऊन बोलण्याचा बहाणा करुन त्यांच्या संमतीशिवाय त्यांच्या शरीरावर स्पर्श करुन जबरदस्तीने चावा घेऊन त्यांचा विनयभंग केला. पोलीस उपनिरीक्षक शिरसाट तपास करीत आहेत.
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Water Supply | पुणेकरांनो पाणी जपून वापरा; गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद