Mula-Mutha Riverfront Development Project | नदी सुधार योजनेच्या यशस्वीतेसाठी ड्रेनेज लाईन्सची नियमित सफाई होणार

नाल्यांच्या कडेने वाहाणार्या ड्रेनेज लाईन्स आणि चेंबर्सची दुरूस्ती करणार – अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी.
पुणे : Mula-Mutha Riverfront Development Project | नदी सुधार योजनेच्या यशस्वीतेसाठी शहरातील नाल्यांच्या बाजूने टाकण्यात आलेल्या ड्रेनेज लाईनचे पाणी फुटलेल्या चेंबर्समधून नाल्यातून नदीत जाउ नये. तसेच ड्रेनेज लाईन्स कायम वाहत्या राहाव्यात यासाठी महापालिका प्रशासनाने विशेष कार्यपद्धती अवलंबिण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. (Prithviraj B P IAS) यांनी दिली.
अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आज शहरातील सांडपाणी व्यवस्थापनाबाबत ड्रेनेज विभागातील अधिकार्यांची बैठक झाली. यामध्ये प्रामुख्याने नाल्यांच्या बाजूने वाहाणार्या ड्रेनेज लाईन्सची दुरूस्तीचा विषय तसेच शहरातील ड्रेनेज लाईनवरील चेंबर्सची नियमित सफाईचे नियोजन करणे यावर भर देण्यात आला. यासाठी नाल्यातील ड्रेनेज लाईनचा ड्रोन सर्व्हे करण्यात आला आहे. काही ठिकाणी चेंबर्स फोडल्याचे निदर्शनास आले असून मैलापाणी पुन्हा नाल्यातून नदीमध्ये जाते. तसेच काही ठिकाणी फुटलेल्या ड्रेनेजच्या परिसरात डुकरांचाही वावर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नाल्यांमधील ड्रेनेज लाईन्स आणि चेंबर्सचीही विशिष्ट पद्धतीने दुरूस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच शहरातील मोठ्या ड्रेनेज लाईन्स तसेच सातत्याने तुंबणार्या ड्रेनेज लाईन्स व चेंबर्सची नियमीत सफाई करण्याचा निर्णयही घेण्यात आला, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी दिली.
नदी सुधार योजना राबवत असताना शहरात निर्माण होणार्या सर्व मैलापाण्यावर प्रक्रिया करूनच ते नदीत सोडण्यासाठी नदी सुधार योजना राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नाल्यांच्या कडेच्या ड्रेनेज लाईन्समधील मैलापाणी नाल्यात जाउ नये, यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. ड्रेनेज लाईन तसेच नाल्यातून वाहाणार्या पाण्याचीही नियमित तपासणी करण्यात येईल.
- पृथ्वीराज बी.पी. (अतिरिक्त महापालिका आयुक्त)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police Nakabandi News | पुणे: पांढर्या पोत्यांमधून आणले जात होते 138 कोटींचे सोन्याचे दागिने; नाकाबंदीत लागले हाताला (Video)
Pune Crime Branch News | रिक्षाचालकाला मारहाण करुन लुबाडणारा चोरटा जेरबंद ! मारहाणीत पायाच्या नडगीचे हाड, मनगटाचे हाड केले होते फॅक्चर
Three Cops Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण