Mula-Mutha Riverfront Development Project (RFD) | नदीकाठ सुधारचे पुणे आणि पिंपरी चिंचवडचे कामही वेगाने होणार ! पूरस्थितीतही नदीकाठ सुधार प्रकल्पाअंतर्गत केलेले काम सुस्थितीत राहीले
पुणे : Mula-Mutha Riverfront Development Project (RFD) | पर्यावरण विभागाचे ना करत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर राष्ट्रीय हरित लवादाने अर्थात एनजीटीने नदीकाठ सुधार प्रकल्पाविरोधातील याचिका फेटाळून लावल्याने पुण्यासोबतच पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या नदीकाठ सुधारच्या कामाला गती मिळणार आहे. पुणे महापालिकेच्यावतीने संगमवाडी ते बंडगार्डन दरम्यानच्या टप्प्याचे ६७ टक्के काम पूर्ण झाले असून बंडगार्डन ते कोरेगाव पार्क परिसरातील सुमारे २७ टक्के काम पुर्ण झाले आहे. अशातच पावसाळा देखिल संपल्याने या कामाला गती मिळणार असून पुढील काही महिन्यांत या दोन्ही टप्प्यांचा वापर सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील अशी माहिती महापालिकेच्या प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता युवराज देशमुख यांनी सांगितले.
महापालिकेच्यावतीने ११ टप्प्यांमध्ये ४४ कि.मी.च्या नदीकाठ सुधार योजनेचे काम सुरू आहे. यापैकी तीन टप्प्यांची कामे मागीलवर्षी सुरू झाली आहेत. यासोबतच प्रशासनाने २०२२ मध्ये औंध ते बाणेरदरम्यानचा मुळा नदीचा काठ सुशोभित करण्याचा निर्णय घेतला. मुळा नदीची एक बाजू पुणे महापालिकेच्या हद्दीत असून दुसरी बाजू पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने याची निविदा देखिल काढली आहे. परंतू पर्यावरणप्रेमी सारंग यादवाडकर यांनी हा प्रकल्प पर्यावरणाला मारक असल्याचा दावा करत एनजीटी आणि सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने प्रकल्पातील बदलांनुसार महापालिकेने पर्यावरण विभागाचे ना हरकत घ्यावे असे आदेश पालिकेला दिले होते. त्यामुळे सुरू असलेल्या प्रकल्पाचे काम धिम्या गतीने सुरू होेते. तर पिंपरी चिंचवड महापालिकेने निविदा मंजूर केल्यानंतरही कामाला सुरूवात केली नव्हती.
यासंदर्भात माहिती देताना मुख्य अभियंता युवराज देशमुख यांनी सांगितले, की पुणे शहरात दोन टप्प्यांचे काम वेगाने पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहील. या प्रकल्पासाठी काही ठिकाणी भूसंपादनही करावे लागणार आहे. प्रामुख्याने ही जागा लष्कराची असल्याने त्यांच्यासोबतची बोलणी अंतिम टप्प्यात आली आहे. यासोबतच नदी काठ सुधारचे काम झालेल्या ठिकाणी देशी झाडेही मोठ्याप्रमाणावर लावण्यात आली असून ही प्रक्रिया पुढेही सुरू ठेवण्यात येईल. प्रकल्पात अडथळा ठरणारी कमीत कमी झाडे काढण्यासाठी आमचा प्रयत्न राहील. त्याचवेळी पुर्वीपेक्षा अधिक वृक्षराजी यासाठी आमचे प्रयत्न राहातील.
नदीकाठ सुधारचे काम पूरातही तांत्रिकदृष्टया भक्कम राहीले
यंदाच्या पावसाळ्यात धरणांमधून नदीपात्रात मोठ्याप्रमाणावर पाणी सोडण्यात आले होते. नदीकाठ सुधार योजनेअंतर्गत बंडगार्डन परिसरात सुरू असलेल्या कामाची देखिल यानिमित्ताने परीक्षा झाली. पुराचे पाणी ओसरल्यानंतर येथील कामावर कुठलाही परिणाम झालेला नाही. हे काम तांत्रिक आणि शास्त्रीयदृष्टया योग्यरित्या झाले आहे. आतापर्यंत याप्रकल्पाचे २८० कोटी रुपयांचे काम झाले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Prisha Tapre | प्रिशाने अवघ्या 16 व्या वर्षी पार केली इंग्लिश खाडी!