Mulund Mumbai Hit And Run Case | हिट अँड रनने पुन्हा मुंबई हादरली ! BMW ने 2 गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना उडवले; एकाचा मृत्यू, एक गंभीर

Mulund Mumbai Hit And Run Case

पुणेरा आवाज – Mulund Mumbai Hit And Run Case | गणेश चतुर्थीच्या दिवशीच पहाटे मुलुंडमध्ये एका आलिशान कार ने दोन तरूणांना चिरडले ज्यात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य गंभीर जखमी झाला आहे. दोघेही गणेशोत्सव मंडळाचे बॅनर रस्त्यावर लावत होते. यावेळी ही घटना घडली. घटनेने मुलुंड परिसरात शोककळा पसरली आहे. (Mulund Mumbai Hit And Run Case)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील अशी या तरूणांची नावे आहेत. मुलुंडच्या गव्हाणपाडा येथील आकृती टॅावरजवळ पहाटे चार वाजता मुलुंडचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश मंडळाच्या मंडपाजवळ प्रीतम आणि प्रसाद हे कार्यकर्ते शिडी लावून बॅनर लावत होते. अचानक भरधाव वेगात एक बीएमडब्लू कार कँपस हॉटेलकडून मुलुंड पूर्व ते वेस्टच्या ब्रिजकडे जात होती. भरधाव वेगाता जाणार्या या कार ने दोघांना शिडीसह जोरदार धडक दिली. धडक देऊन हा चालक थांबला देखील नाही, मुलुंड पश्चिमेकडे भरधाव वेगानं पळून गेला. यात प्रीतमचा मृत्यू झाला असून प्रसादची प्रकृती गंभीर आहे. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. पोलिसांनी प्रसादला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पोलिसांनी तात्काळ सा घटनेचा तपास सुरू केला असून कार चालकाचा शोध सुरू आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे यांच्या हस्ते येरवडा, गांधीनगर भागात 2 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार

PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी

You may have missed