Mumbai Crime News | अविवाहित 20 वर्षीय मुलीला दिवस गेल्याचे कळताच आई बिथरली; मुलीची केली हत्या, हत्येत अल्पवयीन बहिणीचाही सहभाग

Mumbai Crime

मुंबई: Mumbai Crime News | अविवाहित मुलगी गर्भवती राहिल्याने संतप्त झालेल्या महिलेने मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हत्या दडपण्यासाठी मुलीने गळफास लावल्याचे आईने पोलिसांना सांगितले होते. मात्र शवविच्छेदन अहवालातून शनिवारी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी ममता दुबे (वय-४६) या महिलेला अटक करण्यात आली आहे. (Murder Case)

अधिक माहितीनुसार, अस्मिता दुबे (वय- २०) ही तरुणी नालासोपारा येथील एका इमारतीत आई वडिल तसेच लहान बहिणीसह रहात होती. गुरूवारी दुपारी तिने गळफास लावून आत्महत्या केल्याची फिर्याद तिची आई ममता दुबे ( वय- ४६) हीने नालासोपारा पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता.

मात्र तिचा चेहरा सुजलेला होता. तसेच दोन्ही हातावर चावा घेतल्याचे निशाण होते. त्यामुळे पोलिसांना संशय आला आणि त्यांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईच्या जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आला. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर अस्मितची मृत्यू ही आत्महत्या नसून गळा आवळून केल्याचे निष्पन्न झाले.

नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल वळवी म्हणाले, ” मयत अस्मिता ही गर्भवती राहिल्याचे तिच्या आईला समजल्याने ती प्रचंड संतापली होती. तिने मुलीला बेदम मारहाण केली. तिची १७ वर्षीय लहान बहिणीने तिचे पाय धरले तर आई ममताने दोन्ही हातावर चावा घेतला तसेच दोरीने गळा आवळून तिची हत्या केली.

ही हत्या दडपण्यासाठी तिने अस्मिताने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता. याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी ममता दुबे हिच्यावर शनिवारी (दि.२२) भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३, ११५ (२) ३५१ (२) ३(५) अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. दुसरी आरोपी अल्वपयीन असल्याने तिला सुधारगृहात दाखल करण्यात येणार आहे.” (Mumbai Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MNS On High Security Number Plate | सरकारने वाहन चालकांकडून खंडणी वसुलीसाठी वापरल्या जाणाऱ्या
‘एच डी नंबर प्लेट’ सक्तीचा फेरविचार करावा; ‘मनसे’ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Kothrud Pune Crime News | शाळेत जातो, असे सांगून 10 वर्षीय मुले घराबाहेर पडली,
घरी न परतल्याने कुटुंबीयांची धावाधाव, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

You may have missed