Mumbai High Court On Badlapur Police | फक्त निलंबन करून काय होणार? दुसऱ्या मुलीचा जबाब अद्याप का नोंदवला गेला नाही?’,मुंबई हायकोर्टाने बदलापूर पोलिसांना खडसावलं
बदलापूर : Mumbai High Court On Badlapur Police | बदलापूरमध्ये एका शाळेत सफाई काम करणाऱ्या कामगाराने दोन चिमुरड्या मुलींचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना घडली. चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाने अख्खा महाराष्ट्र हादरला. या प्रकरणाची दखल आता मुंबई हायकोर्टाकडून घेण्यात आली आहे. याप्रकरणी कोर्टाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. (Badlapur School Girl Incident)
या प्रकरणाची तातडीची सुनावणी सुरु आहे. या सुनावणी दरम्यान मुंबई हायकोर्टाने बदलापूर पोलिसांना झापले आहे. बदलापूर पोलिसांवर या प्रकरणात हलगर्जीपणा केल्याचा आणि दिरंगाई केल्याचा आरोप आहे. फक्त निलंबन करून काय होणार? तसंच या प्रकरणात दुसऱ्या मुलीचा जबाब अद्याप का नोंदवला गेला नाही?, असा सवाल करत हायकोर्टाने बदलापूर पोलिसांना खडसावले आहे.
बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यानंतर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी (दि.२०) बदलापूरमध्ये जमा झाली होती. आंदोलकांनी संबंधित शाळेत प्रवेश करत तोडफोड केली. त्याचवेळेस काही आंदोलक रेल्वे स्थानकाकडे गेले व त्यांनी रुळांवर ठिय्या मांडला. दरम्यान बदलापूर रेल्वे सेवा ९ ते १० तास संपूर्ण ठप्प झाली होती.
राज्यभरात सातत्याने महिलांवर होत असलेल्या अन्याय-अत्याचाराच्या घटनांविरोधात महाविकास आघाडीने
आक्रमक पवित्रा घेतला असून येत्या २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. (Mumbai High Court On Badlapur Police)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Mundhwa Pune Crime News | मुंढवा: रस्त्यावरील खड्यातील पाणी अंगावर उडाल्याने कारचालकाला बेदम मारहाण
Pune Rural Police | पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाची पोलीस भरतीची लेखी परिक्षा 24 ऑगस्टला लोणी येथे