Mumbai High Court On Maharashtra Govt | ‘लोकं रस्त्यावर आल्यावर तुम्हाला जाग येणं खेदजनक’, बदलापूर प्रकरणावरून हायकोर्टाचे राज्य सरकारवर ताशेरे
मुंबई : Mumbai High Court On Maharashtra Govt | बदलापूर प्रकरणात (Badlapur School Girl Incident) हायकोर्टाने सुमोटो याचिका दाखल करुन घेतली होती. या याचिकेवर न्या. रेवती मोहिते डेरे (Judge Revati Mohite Dere) व न्या. पृथ्वीराज चव्हाण (Judge Prithviraj Chavan) यांच्या खंडपीठापुढे आज गुरुवारी (दि.२२) तातडीची सुनावणी झाली. हायकोर्टाच्या खंडपीठाने पोलीस आणि राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. लोकांनी रस्त्यावर उतरल्यानंतर तुम्हाला जाग येणं हे खेदजनक असल्याचे कोर्टाने म्हंटले आहे.
तपास विशेष पथकाकडे देण्यापूर्वी बदलापूर पोलीसांनी काय केलं? त्याची कागदपत्रं कुठे आहेत? पीडीत मुलींचं समुपदेशन केलंत का?, असे सवाल न्यायालयाने राज्य सरकारच्या वकिलांना विचारण्यात आले.
राज्य सरकारच्या वकिलांनी या प्रकरणावर झालेल्या तपासाबाबत कोर्टात माहिती देताना सांगितले की , पहिल्या पीडीत मुलीचं समुपदेशन झालेलं आहे, दुसऱ्या मुलीचं समुपदेशन सुरू आहे. घटना १२ आणि १३ ऑगस्ट रोजी झाली, पालक १६ ऑगस्टला पोलीस ठाण्यात आले. (Mumbai High Court On Maharashtra Govt)
याप्रकरणी काल, २१ ऑगस्ट रोजी एसआयटी स्थापन झाली आहे.
संबंधित पोलीस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांना निलंबित केलेलं आहे.
घटना लपवल्याबद्दल शाळेवर कारवाई करणार, असे महाअधिवक्ता विरेंद्र सराफ यांनी न्यायालयाला सांगितले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Mundhwa Pune Crime News | मुंढवा: रस्त्यावरील खड्यातील पाणी अंगावर उडाल्याने कारचालकाला बेदम मारहाण
Pune Rural Police | पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाची पोलीस भरतीची लेखी परिक्षा 24 ऑगस्टला लोणी येथे