Mumbai Hit & Run Case | हिट अँड रन ! मद्यधुंद असलेल्या कार चालकाने दोघांना चिरडलं, 3 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू

मुंबई : Mumbai Hit & Run Case | वडाळ्यात हिट अँड रनची घटना घडली आहे. घरासमोर महिला आणि त्यांचा लहान मुलगा झोपला होता. मात्र, भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने दोघांना चिरडले आहे. चालक दारूच्या नशेत असल्याची माहिती आहे. या अपघातात ३ वर्षीय मुलाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. जखमी महिलेवर उपचार सुरु आहेत. तर आरोपी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Mumbai Accident News)
ही धक्कादायक घटना वडाळा परिसरातील राम मंदिर बाळाराम खेडेकर मार्गावर घडली आहे. घरासमोर महिला आणि तिचा लहान मुलगा झोपला होता. यादरम्यान, चारचाकी भरधाव वेगाने आली. यावेळी कार चालक नशेत धुंद होता. त्याने चारचाकी वाहन महिला आणि चिमुकल्याच्या अंगावरून नेली. या घटनेत तीन वर्षीय मुलाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर, महिला गंभीर जखमी आहे. महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. (Mumbai Hit & Run Case)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
MNS On High Security Number Plate | सरकारने वाहन चालकांकडून खंडणी वसुलीसाठी वापरल्या जाणाऱ्या
‘एच डी नंबर प्लेट’ सक्तीचा फेरविचार करावा; ‘मनसे’ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Kothrud Pune Crime News | शाळेत जातो, असे सांगून 10 वर्षीय मुले घराबाहेर पडली,
घरी न परतल्याने कुटुंबीयांची धावाधाव, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण