Mumbai Pune Highway Accident | मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; पुरंदरच्या भूमी अभिलेख अधिकारी मनीषा भोसले यांचा मृत्यू

पुणे : Mumbai Pune Highway Accident | मुंबई-पुणे महामार्गावर खडकी रेल्वे स्थानक परिसरात भरधाव एसटी बसने कारला धडक देऊन भीषण अपघात घडल्याची घटना रविवारी (दि.२५) घडली. अपघातात कारमधील भूमी अभिलेख विभागातील अधिकारी महिलेचा मृत्यू झाला.
मनीषा विजयसिंह भोसले Manisha Vijaysingh Bhosale (वय ४०, मूळ रा. कवठे महांकाळ, सांगली) असे मृत्यू झालेल्या अधिकारी महिलेचे नाव आहे. या प्रकरणी खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, बसचालक अनंत पंजाबराव उईके (वय ३३, रा. नारायणगाव) याला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा भोसले आणि त्यांचे पती शासकीय अधिकारी आहेत. मनिषा भोसले यांची नुकतीच पुरंदर तालुक्यात बदली झाली होती. त्या पिंपरीतील चिखली भागात राहणाऱ्या भावाकडे आल्या होत्या.
दरम्यान पुरंदरला बदली झाल्याने भोसले यांनी हडपसर भागात भाडेतत्वावर घर घेतले आहे. रविवारी सकाळी कारमधून भोसले, त्यांचे पती आणि भाऊ हडपसर कडे निघाले होते. एसटी बस शिवाजीनगर स्थानकातून नारायणगावकडे निघाली होती.
खडकी रेल्वे स्थानक परिसरात समोरून येणाऱ्या भरधाव एसटी बसने कारला जोरदार धडक दिली. अपघातात मोटारीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. अपघात नंतर एसटी बसचालकाचे नियंत्रण सुटले. एसटी बसने एका मोटारीला आणि दुचाकीस्वाराला धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला.
अपघातानंतर रहिवासी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
मोटारीत अडकलेल्या तिघांना बाहेर काढून तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, भोसले यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
या अपघातात भोसले यांचे पती आणि मोटारचालक भाऊ जखमी झाला असून, त्यांच्यावर ससूनमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
या अपघातातील १२ प्रवाशांना दुखापत झाली असून त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अपघातानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अपघातात बसचे व कारचे मोठे नुकसान झाले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
BJP On Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती;
टूलकिट पुन्हा चर्चत?, विविध राज्यातील नेत्यांना प्रचारकार्यात उतरवण्याचा निर्णय