Mumbaikar Players Will Be Felicitated | भारतीय क्रिकेट संघातील मुंबईकर खेळाडूंचा विधिमंडळात होणार सन्मान; रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव सह इतरही खेळाडू उपस्थित राहणार

Mumbaikar Players Will Be Felicitated | टी २० विश्वचषक जिंकून टीम इंडिया मायदेशी परतली आहे. दरम्यान विश्वविजेत्या भारतीय संघातील मुंबईकर खेळाडूंचा महाराष्ट्र सरकारकडून सत्कार होणार आहे. विधिमंडळात येण्यासाठी चारही खेळाडूंना निमंत्रण देण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट संघाने तब्बल १३ वर्षांनंतर आयसीसी विश्वचषक स्पर्धा जिंकली. टी-२० मालिका जिंकून भारताचा जगज्जेता संघ आज भारतात परतला आहे.
पंतप्रधान मोदींशी हितगुज साधल्यानंतर भारतीय संघ मुंबईत येईल. दरम्यान भारतीय संघातील मुंबईकर खेळांडूचा महाराष्ट्राच्या विधीमंडळात सत्कार करावा, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत केली.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही तात्काळ या मागणीचा सकारात्मक विचार करत
मुंबईकर खेळाडूंचा विधीमंडळात सत्कार करण्यास मान्यता दिली.
उद्या (दि. ५ जुलै) खेळाडूंना विधीमंडळात बोलावून सन्मानीत करण्यात येणार आहे. (Mumbaikar Players Will Be Felicitated)
याबद्दल माहिती देताना आमदार प्रताप सरनाईक म्हणाले की,
मुंबईकर खेळाडू आणि भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा,
अंतिम सामन्यात ज्याच्या कॅचमुळे सामना फिरला तो सुर्यकुमार यादव,
यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे हे चारही खेळाडू मुंबईकर आहेत. त्याचा आम्हाला अभिमान आहे.
ज्याप्रकारे २००७ आणि २०११ साली विश्वचषक जिंकल्यानंतर महाराष्ट्र सरकारने
मुंबईकर खेळाडूंचा यथोचित सन्मान केला होता.
त्याप्रमाणेच यंदाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईकर खेळाडूंचा सन्मान करायला हवा.
या मागणीनंतर आता खेळाडू उद्या विधीमंडळात येणार आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar | “माझा दोष फक्त इतकाच आहे की…” अजित पवारांनी जारी केला व्हिडिओ संदेश; जाणून घ्या
Mahavikas Aghadi | ‘आघाडी सरकार आले, तर महिलांना एक लाख’; पृथ्वीराज चव्हाणांनी केलं जाहीर