Mundhwa Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून टोळक्याचा तिघांवर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; घोरपडी येथील बी टी कवडे रोडवरील पहाटेची घटना

koyta

पुणे : Mundhwa Pune Crime News | दुकानाबाहेर चौघे मित्र गप्पा मारत थांबले असताना पूर्ववैमनस्यातून एका टोळक्याने तिघांवर कोयत्याने वार (Koyta Attack) करुन त्यांना गंभीर जखमी केले (Attempt To Murder). मुंढवा पोलिसांनी (Mundhwa Police) चौघा जणांच्या टोळक्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (Mundhwa Pune Crime News)

याबाबत एका २८ वर्षाच्या तरुणाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना घोरपडीतील बी टी कवडे रोडवरील (BT Kawade Road Pune) देवकी पॅलेस चौकातील स्वराज अमृततुल्य शेजारी गुरुवारी पहाटे २ वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे तीन मित्र हे पहाटेपर्यंत गप्पा मारत बसले होते. या टोळक्याबरोबर त्यांचे शाब्दिक वाद व बाचाबाची यापूर्वी झाली होती. या वादाचा राग मनात ठेवून तीन ते चार जण तेथे आले. त्यांनी अमित परदेशी याच्या डोक्यात व हनुवटीवर वार करुन गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादीस हाताने व उलट्या कोयत्याने मारहाण केली. सोहेश अलमले (रा. मांजरी) याच्या कानाजवळ धारदार हत्याराने वार करुन जखमी केले.

अजय पवार याच्या डोक्यात मानेवर,पाठीमध्ये, पोटावर, दोन्ही पायावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तेथील स्वीफ्ट कारची मागील काच फोडून नुकसान करुन ते टोळके पळून गेले. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे (API Sandeep Jore) तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pashan Pune Crime News | मनी लॉड्रिंगच्या नावाने आय टी इंजिनिअरची 6 कोटी 29 लाख रुपयांची
फसवणूक; डिजिटल अरेस्ट करुन सीबीआयच्या नावाने घातला गंडा

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आयोजित
राज्यस्तरीय किल्ले बनवा स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा उत्साहात संपन्न

Pune Crime News | मतदानासाठी रस्त्यावर उतरलेले लोक, कडक पोलीस बंदोबस्तामुळे गुन्हेगारी
‘निरंक’ ! किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत तर गुन्ह्यांमध्येही मोठी घट

You may have missed