Mundhwa Pune Crime News | गळा दाबून विवाहितेचा खून ! सात वर्षाच्या लहान मुलीने घटनेपूर्वी काय घडले सांगितले, दीराला अटक
पुणे : Mundhwa Pune Crime News | घरगुती भांडणातून दिराने भावजयीचा गळा दाबून तिचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी दिराला अटक केली आहे (Mundhwa Murder CAse). लहान मुलीने घटनेअगोदर काय घडले हे सांगितल्याने खूनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना मदत झाली.
कविता नागराज गडदर (वय २४, रा. साईबाबा कॉलनी, केशवनगर, मुंढवा) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. मल्लिकार्जुन शरणाप्पा गडदर (वय २३, रा. साईबाबा कॉलनी, मुंढवा) असे अटक केलेल्या दिराचे नाव आहे.
या बाबत सहायक पोलीस निरीक्षक संजय सिद्धेश्वर माळी यांनी मुंढवा पोलिसांकडे (Mundhwa Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना १४ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली. घरातील ७ वर्षाच्या मुलीमुळे हा खूनाचा प्रकार समोर आला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कविता नागराज गडदर ही राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आली होती. पोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी नोंद केली. तिचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यात तिचा गळा दाबल्यामुळे मृत्यु झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले होते. दरम्यान, सर्व नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी पार्थिव घेऊन कर्नाटकातील गावी गेले होते. हा खूनाचा प्रकार असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी त्यांना गावाकडून बोलावून घेतले.
याबाबत मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब निकम (Sr PI Balasaheb Nikam) यांनी सांगितले की,
कविता हिचा पती कामानिमित्त गावी गेला होता. घरामध्ये कविता, तिची दोन मुले आणि दीर हे होते.
घटना घडली तेव्हा मोठा मुलगा हॉलमध्ये झोपी गेला होता. कविता हिची सात वर्षाची मुलगी घरात होती.
दीर मल्लिकार्जुन गडदर याने तिला खेळण्यासाठी घराबाहेर जाण्यास सांगितले.
ती घराचे बाहेर गेल्यावर त्याने कविता हिचा गळा दाबून तिचा खून केला.
मुलीने आपल्याला घराबाहेर जाण्यास सांगितल्याची माहिती पोलिसांना दिली. मल्लिकार्जुन गडदर याचे घरगुती कारणावरुन भांडण झाले होते. तो सेंट्रिंगचे काम करतो. त्याला दारु पिण्याचे व्यसन आहे. दारु पिण्यासाठी पैसे देण्यावरुन त्यांच्यात भांडणे होत होती. या कारणावरुन त्याने कविताचा गळा दाबून खून केला. पोलिसांनी स्वत: फिर्यादी होत गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक बाळासाहेब निकम तपास करीत आहेत. (Mundhwa Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
ACB Trap On Female Education Officer | 2 लाखांची लाच घेताना महिला शिक्षणाधिकारी एसीबीच्या जाळ्यात;
शासनाने दिलेले थकीत वेतन अधीक्षकांनी ठेवले अडवून
Eknath Shinde On Badlapur School Girl Incident | बदलापूर प्रकरणावरून मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट;
म्हणाले, बाहेरून लोकं आणली, आंदोलन राजकीय प्रेरित…”
Maharashtra Assembly Election 2024 | भाजपचे दोन नेते शरद पवारांच्या संपर्कात, राजकीय समीकरणे बदलणार?