Mundhwa Pune Crime News | पुणे: मालकाने नवीन कुत्रा आणल्याने केअरटेकरने जुन्या कुत्र्याला जाळून मारुन टाकले; मुंढव्यातील घटना

पुणे: Mundhwa Pune Crime News | मालकाने नवीन कुत्रा आणल्याने केअरटेकरने जुन्याला कुत्र्याला हाकलून लावले. परंतु, मालकावर अव्यक्त प्रेम करणारा हा कुत्रा वारंवार त्याच्याकडे येत होते. त्याला हाकलून लावल्याने त्याने रागाच्या भरात त्याच्या आई वडिलांचा चावा घेतला. त्यामुळे या केअरटेकरने कुत्र्याच्या डोक्यात लाकडी बांबुने मारहाण करुन त्याला जीव घेतला. त्यानंतर खड्ड्यात टाकून त्याला जाळल्याचा प्रकार मुंढव्यात समोर आला आहे.
याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी केअरटेकर बिरु डोलारे (वय ४०, रा. आर एस इंटरप्रायझेसच्या शेजारी, झेड कॉर्नर, केशवनगर, मुंढवा) याच्यावर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्याच्या विविधी कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मिशन पॉसिबल फाऊंडेशनच्या पदमिनी पिटर स्टंप (वय ६६, रा. भवानी पेठ) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना आर एस इंटरप्रायझेसच्या शेजारील झेड कॉर्नर येथे ५ ऑक्टोबर रोजी घडली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिरु डोलारे याच्याकडे पूर्वी या कुत्र्याला सांभाळण्याचे काम होते. त्यानंतर त्याच्या मालकाने नवीन कुत्रा आणला. तेव्हा केअर टेकरने जुन्या कुत्र्याला हाकलून लावले. तरीही हा इनामी कुत्रा वारंवार त्याच्याकडे येत असे. पण, तो त्याला हाकलून लावत असे. त्यामुळे या कुत्र्याने केटर टेकरच्या आई वडिलांना चावा घेतला होता. त्यामुळे केअर टेकरने या चॉकलेटी पांढर्या कुत्र्याला खाण्यासाठी बोलावले. इनामी कुत्रा काही त्याच्या मनातील काळंबेरं ओळखू शकला नाही. त्याच्या दृष्टीने केअर टेकर हाच मालक होता. आपल्या मालकाला उपरती झाली, असे बहुदा या कुत्र्याला वाटले, तो केअरटेकरच्या जवळ गेला. तेव्हा त्याने कुत्र्याच्या डोक्यावर लाकडी बांबुने मारहाण करुन त्याला गंभीर जखमी केले. त्याचे पाय दोरीने बांधले. त्याला एका खड्ड्यामध्ये टाकले. त्याच्या अंगावर प्लॅस्टिक, कागद, लाकडे व पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळून टाकले.
हा कुत्रा बेघर झाल्यानंतर त्या परिसरातील महिला त्याला नियमितपणे खायला देत होत्या. कुत्रा नेहमीच्या ठिकाणाहून गायब झाल्याचे या महिलांच्या लक्षात आल्यावर त्यांनी ते पदमिनी स्टंप यांना सांगितले. त्यांनी परिसरात शोध घेतल्यावर त्यांना कुत्र्याचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला. सहायक पोलीस निरीक्षक माळी तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Chinchwad Assembly Election 2024 | राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राहुल कलाटेंवर अदखलपात्र गुन्हा दाखल; वंचितच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी
Katraj Pune Crime News | कात्रजमध्ये गुंडांचा हैदोस ! तरुणांना मारहाण करुन रिक्षा, कारच्या काचा फोडून माजवली दहशत
Maharashtra Assembly Election 2024 | केवळ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातून शासनाने कमविले किमान 43 लाख 62 हजार रुपये जादा