Murlidhar Mohol | मुख्यमंत्री पदाच्या चर्चेवरून मुरलीधर मोहोळ यांचे स्पष्टीकरण; म्हणाले – ‘माझ्या नावाची चर्चा निरर्थक आणि कपोलकल्पित’

Murlidhar Mohol

पुणे : Murlidhar Mohol | विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. यामध्ये महायुतीला मोठे यश मिळाले. भाजपने सर्वाधिक १३२ जागा जिंकल्या, शिवसेनेच्या शिंदे गटाने ५७ तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने ४१ जागा जिंकल्या. मात्र मुख्यमंत्री पदी कोण असणार? यावरून राज्यात अद्यापही सत्तास्थापन होऊ शकलेले नाही. त्यातच आता केंद्रीय नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची मुख्यमंत्रीपदासाठीची चर्चा सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे.

पुणे शहरात विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीचा दणदणीत विजय झाला. त्यानंतर पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची मुख्यमंत्रिपदी निवड होईल अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. या चर्चेवर आता मुरलीधर मोहोळ यांनी स्वतःच उत्तर दिले आहे.

मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत ‘एक्स’ या समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ” समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी होणारी चर्चा निरर्थक आणि कपोलकल्पित आहे. आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते मा. देवेंद्रजींच्या नेतृत्वात लढलो. महाराष्ट्राच्या जनतेने कौलही ऐतिहासिक दिला आहे.

आमच्या भारतीय जनता पार्टीत पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो.
असे निर्णय पार्लिमेंटरी बोर्डात एकमतावर घेतले जातात, ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर ! आणि पार्लिमेंट्री बोर्डात एकदा का निर्णय झाला, तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो.
म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन आहे”, असे मोहोळ यांनी म्हंटले आहे. (Murlidhar Mohol)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्‍वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू

Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी

You may have missed