Murlidhar Mohol On Contractors | ‘प्रकल्प आणि योजनांच्या कामांना विलंब लावणार्या ठेकेदारांना अखेरची तंबी द्या अन्यथा कामे काढून घ्या’ – केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
मॅरेथॉन बैठकांमध्ये घेतला पीएमपीएमएल, मेट्रो आणि शहरातील विकास कामांचा आढाव
पुणे : Murlidhar Mohol On Contractors | पीएमपीएमएलला बस (PMPML Bus) पुरवठा करणार्या कंपनीने दीड वर्षांनंतरही अद्याप बस पुरवठा केला नाही. चोवीस तास पाणी पुरवठा योजनेतही काही ठेकेदारांनी विलंब लावला आहे. शहरातील प्रकल्पांना विलंब लावणार्या अशा ठेकेदारांना वेळेत काम पुर्ण करायची अखेरची तंबी द्या अन्यथा त्यांच्याकडे कामे काढून घ्या, या शब्दात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज प्रशासनाला दिले. त्याचवेळी केंद्र आणि राज्य सरकारकडे अडकलेल्या शहरातील प्रकल्पांच्या कामांबाबत मी स्वत: पाठपुरावा करेन, असेही मोहोळ यांनी प्रशासनाला आश्वस्त केले.
केंद्रीय राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी पीएमपीएमएल, महामेट्रो (Mahametro) आणि महापालिकेमध्ये मॅरेथॉन बैठकांचे आयोजन करून सुरू असलेल्या प्रकल्प आणि योजनांचा आढावा घेतानाच भविष्यातील प्रकल्पांवर देखिल संबधित विभागाच्या अधिकार्यांशी चर्चा केली. पुणे महापालिकेत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी भाजपचे शहरअध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate), माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले (Shrinath Bhimale) यांच्यासह माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
मोहोळ यांनी सांगितले, की मंत्री म्हणून काम करत असलो तरी खासदार या नात्याने शहरातील विकास कामांचा आणि पुढील काळातील योजनांना गती मिळावी यासाठी प्रशासकीय बैठका घेतल्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचा एकत्रित विचार करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याच्यादृष्टीने पीएमपीएमएल आणि मेट्रोच्या अधिकार्यांच्या बैठक घेतल्या. दोन्ही शहरे आणि पीएमआरडीए हद्दीचा विचार करता दोन्ही शहरांसाठी तीन हजार सहाशे बसेसची गरज आहे. सध्या एक हजार नउशे बसेस ताफ्यात असून त्यातील डिझेलच्या बसेस कमी करायच्या आहेत. चारशे बसेस भाडेतत्वावर घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्प्यात आली असून शंभर मिनी बसेसची निविदा देखिल लवकरच उघडली जाईल. ताफ्यातील डिझेलच्या बसेसही येत्या काळात सीएनजी मध्ये कन्वर्ट करण्यात येतील. यापुर्वी केंद्र आणि राज्य शासनाकडून बसेस मिळाल्या आहेत. आणखी बसेस मिळाव्यात यासाठी मी प्रयत्न करेन. मेट्रोचे जाळे विस्तारत असताना लास्ट माईल कनेव्हीटी आणि मेट्रोचा वापर वाढावा यासाठी फिडर सेवा सेवा सुरू करण्यासाठी मेट्रोने देखिल बसेससाठी प्रयत्न करावेत, असे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
महापालिका अधिकार्यांच्यासोबत झालेल्या बैठकीत चोवीस तास पाणी पुरवठा योजना, रिव्हर फ्रंट, उड्डाणपूल कामाचा आढावा घेतला. निवडणूक नसल्याने दोन वर्षात नागरीक आणि महापालिकेमध्ये समन्वय राहिला नाही. यासाठी नागरिकांच्या अडचणी लेखी स्वरूपात मांडल्या. अतिक्रमण, अर्धवट प्रोजेक्ट, ट्रॅफिक च्या समस्या आयुक्तांच्या कानावर घातल्या. प्रकल्पातील अडथळे दूर करून गती देण्यासाठी प्रयत्न, मी स्वत: प्रयत्न करणार असल्याचे मोहोळ यांनी यावेळी नमूद केले.
जिल्ह्यातील रेल्वेची कामे गतीने करण्यासाठी प्रयत्न
पुणे लोणावळा दरम्यानच्या चवथ्या लेन चा मार्ग प्रलंबित आहे. त्यासाठी पुढील काळात प्रयत्न करण्यात येईल.
पुणे नगर, पुणे नाशिक रेल्वे चे काम सुरू आहे. उरुळी येथे नवीन टर्मिनलसाठी प्रयत्न आहे. दौंड मनमाड चा आढावा घेतला.
तसेच जिल्ह्यातील रेल्वेच्या कामांचा आढावा घेतला असून केंद्रात रेल्वे मंत्रालयाकडे यासाठी पाठपुरावा करेन, असे मोहोळ यांनी सांगितले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Tomato Price Hike | वेगाने वाढला टोमॅटोचा दर, 100 रुपये किलोवर पोहोचला, जाणून घ्या कधी होणार स्वस्त?