Murlidhar Mohol On Pothole Pune | शहरातील रस्त्यांवरील खड्डे तीन दिवसांत बुजवा; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची महापालिका आणि पोलिसांना तंबी
पुणे : Murlidhar Mohol On Pothole Pune | रस्त्यांवरील खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे ऐन पावसाळ्यात पुणेकरांना मनस्ताप सोसावा लागत आहे. महापालिका कामात कमी पडतेय. वाहतूक पोलिस रस्त्यावर दिसत नाहीत. महापालिकेने दिवस रात्र काम करून तातडीने खड्डे बुजवावेत. वाहतूक नियोजनासाठी पोलिसांनी पावले उचलावीत, असे आदेश केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रशासनाला दिले.
मोहोळ यांच्या उपस्थितीत शनिवारी महापालिका भवन येथे महापालिका अधिकारी आणि पोलिस प्रशासनाची संयुक्त बैठक झाली. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले (Rajendra Bhosale) यांच्यासह पथ व आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी, पोलिस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar) आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी, आमदार माधुरी मिसाळ (Madhuri Misal), भीमराव तापकीर (Bhimrao Tapkir), सुनिल कांबळे (MLA Sunil Kamble), सिद्धार्थ शिरोळे (Siddharth Shirole), भाजपचे शहरअध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर मोहोळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मोहोळ म्हणाले, सततच्या पावसाने रस्त्यांवर मोठ्याप्रमाणावर खड्डे पडले आहेत. तसेच वाहतुकीचीही कोंडी होत आहे. शहरातील प्रत्येक रस्त्यांवर हे दृश्य पाहायला मिळत असून नागरिक संतप्त झाले आहेत. महापालिकेने आज रात्रीपासूनच मुख्य रस्त्यांसोबतच अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम प्राधान्याने हाती घ्यावे. पुढील तीन ते चार दिवसांत खड्डे बुजविण्यासाठी खाजगी कंपन्यांची मदत घ्यावी. शहरातील पंधरा क्षेत्रिय कार्यालय स्तरावर प्रत्येक दोन टीम्स बनवून युद्ध पातळीवर काम करावे.
वाहतुकीची कोंडी होत असताना पोलिसांचे अस्तित्व रस्त्यावर जाणवत नाही. कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने वाहतूक पोलिसांना अधिकचे वॉर्डन पुरवावेत. पोलिसांनीही होमगार्डस्ची मदत घ्यावी. मुदतीतील रस्त्यांवर खड्डे आढळल्यास संबधित ठेकेदार आणि अधिकार्यांना पाठीशी घालू नये. पुढील आठवड्यात पुन्हा बैठक घेउ, असा इशारा मोहोळ यांनी यावेळी प्रशासनाला दिला.
मुंबईच्या तुलनेत पुण्याची स्थिती बरी
पुणे दौर्यावर असलेले माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेबचे प्रमुख यांनी शनिवारी रस्त्यांवरील खड्डयांवरून भाजपवर टीका केली. या टीकेला उत्तर देताना मोहोळ म्हणाले, त्यांच्याकडे २५ वर्षे मुंबई महापालिकेची सत्ता होती. तेथील रस्त्यांची अवस्था पाहता मुंबई पेक्षा पुण्याची स्थिती बरी आहे, असा टोला लगावला.
नागरिकांना मनस्ताप, खड्डे, कोंडी.
मनपा, पोलीस बैठक. तातडीने खड्डे बुजवावेत. तीन दिवसात खड्डे बुवावेत. पोलीस आणि मनपा यांनी आज व उद्या रात्री बुजवावेत. खासगी प्लांट ची मदत घेतली जावी. १५ वॉर्ड ऑफिस. प्रत्येकी दोन टीम, वॉर्डन चा पुरवठा करावा. पोलिसांनी होमगार्ड मदत घ्यावी| मुख्य व अंतर्गत १४०० किमी रस्ते. मनपा कामात कमी पडतेय. वॉर्ड ऑफिसर रात्स्यावर दिसत नाही. पोलिसांचा िीशीशपी दिसत नाही. पुढच्या आठवड्यात आढावा घेतला जाईल.
चांगले रस्ते व्हावेत. ठेकेदारांचे मुदतीतील रस्ते दुरुस्त करून घ्या. मुंबई च्या तुलनेत पुण्याची अवस्था चांगली आहे.
मुंबईत त्यांची सत्ता होती परिस्थिती माहिती आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Rohit Pawar NCP (SP) | रोहित पवारांना लागले मंत्रिपदाचे वेध?