Murlidhar Mohol On Pune Metro | पुणे: ‘जिल्हा न्यायालय-स्वारगेट भुयारी मेट्रोमार्ग काही दिवसांतच पुणेकरांच्या सेवेत’; स्वारगेट-कात्रज मेट्रोमार्गाचेही त्याचवेळी भूमिपूजन

Murlidhar Mohol

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती

पुणे : Murlidhar Mohol On Pune Metro | पीसीएमसी ते स्वारगेट या मेट्रोमार्गावरील (PCMC To Swargate Metro) जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या शेवटच्या (Shivaji Nagar Court To Swargate Metro) टप्प्याचे काम पूर्णत्वाकडे आले असून काही तांत्रिक परवानग्या बाकी आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांतच या मार्गावरदेखील मेट्रो धावू लागेल, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री (सहकार व नागरी हवाई वाहतूक) मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

या मार्गावर मेट्रोकडून सुरू असलेल्या कामांचा आढावा केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांसमवेत घेतला. यावेळी आ. माधुरी मिसाळ (Madhuri Misal), महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हार्डीकर (Shravan Hardikar) यांच्यासह अधिकारी समवेत होते.

मोहोळ पुढे म्हणाले की, ‘काही स्थापत्यविषयक कामे पूर्ण केल्यानंतर आणि तांत्रिक परवानग्या मिळाल्यानंतर येत्या काही दिवसांतच जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा भूमिगत मेट्रोमार्ग पुणेकरांच्या सेवेत दाखल होईल. त्यासंदर्भातील आवश्यक बाबींची पूर्तता करण्याचे काम ‘महामेट्रो’कडून वेगाने सुरू आहे. सहा किलोमीटर लांबीच्या या मार्गावरील कसबा पेठ, मंडई आणि स्वारगेट या स्थानकांचे काम पूर्ण झाले आहे. काही स्थानकांची नावे बदलण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून याबाबतचे गॅझेटही लवकरच प्रसिद्ध होईल. लवकरच या मार्गिकेचे उद्घाटन होणार आहे. (Murlidhar Mohol On Pune Metro)

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील कॅबिनेटने मंजुरी दिलेल्या स्वारगेट ते कात्रज या भुयारी मार्गाचे भूमिपूजनही याचवेळी होणार असल्याचेही मोहोळ यांनी सांगितले.
वनाझ ते रामवाडी मार्ग १०० टक्के पूर्णत्वाकडे गेला असून पुणेकर त्याचा चांगल्या पद्धतीने वापर करत आहेत.
पीसीएमसी ते स्वारगेट हा १७.५ किलोमीटर लांबीचा मार्ग ९० टक्के कार्यान्वित झाला असून
त्यातील दिवाणी न्यायालय ते स्वारगेट मार्गाचे कामही वेगाने पूर्ण होत आहे.
लवकरच हाही संपूर्ण मार्ग पुणेकरांच्या सेवेत दाखल होईल.
तसेच, वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या विस्तारित मेट्रोमार्गासाठी आवश्यक परवानग्या मिळवून
लवकरात लवकर त्यांचेही काम सुरू करण्यात येईल, असे मोहोळ म्हणाले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Vanraj Andekar Murder Case | कौटुंबिक वादातून वनराज आंदेकर यांचा निर्घुण खून !
जावयानेच आखला खूनाचा कट, गोळीबार करुन कोयत्याने केले वार (CCTV Video)

Andekar Gang History | पुणे : आंदेकर टोळीचा 4 दशकांचा रक्तरंजित इतिहास

Vanraj Andekar Murder Case | पुणे : वनराज आंदेकर खून प्रकरणी दोघांना (कोमकर बंधूना) अटक

You may have missed