Murlidhar Mohol On Unauthorized Construction | शहरातील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांवर तत्काळ कारवाई करा – केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ

Murlidhar Mohol

पुणे : Murlidhar Mohol On Unauthorized Construction | शहरातील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांवर तत्काळ कारवाई करा. कोणाचाही फोन आला तर घेवू नका मात्र शहरातील रस्ते अतिक्रमण मुक्त झाले पाहिजेत असे आदेश सहकार आणि नागरि विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महापलिका आयुक्तांना दिले आहेत.

महापालिकेतील विकास प्रकल्प (PMC DP) आणि विविध प्रश्‍नांसदर्भात मोहळ यांनी काल बैठक घेतली. याबैठकीला महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले (Rajendra Bhosale), अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज,बी.पी. (Prithviraj B P) महापालिकेच्या सर्व विभागांचे अधिकारी, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate), माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले (Shrinath Bhimale) यांच्यासह भाजपचे माजी नगरसेवक बैठकीला उपस्थित होते.

शहरातील रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात अतिक्रमणे झाली आहे. प्रत्येक दहा फुटांवर गाडी आहे. नागरिकांना चालण्यासाठी फुटपाथ शिल्लक राहिलेले नाहीत महापालिका अधिकार्यांना वारंवार याची माहिती देवून सुध्दा कारवाई होत नाही. अशा तक्रारी बैठकीला उपस्थित असणार्या नगरसेवकांकडून करण्यात आल्या.

याविषयी मोहोळ म्हणाले, महापालिका क्षेत्रातील रस्ते अतिक्रमण मुक्त झाले पाहिजेत. ही जबाबदारी महापालिकेची आहे.
कोणत्याही अनधिकृत व्यवसाय असुद्या शहरातील सर्व रस्त्यांचे अतिक्रमण काढले पाहिजे.
महापालिका प्रशासनाने यामध्ये टाळाटाळ केलेली अजिबात चालणार नाही.
काही वेळा महापालिकेचा अतिक्रमण विभाग कारवाईला जाण्याच्या अगोदर ज्या ठिकाणी कारवाई होणार आहे.
त्याठिकाणी फोन करुन सांगण्यात येते.
असे कोणी अधिकारी अथवा कर्मचारी अढळल्यास त्याच्यांवर कारवाई करा असे आदेश मोहोळ यांनी महापालिका अधिकार्यांना दिले.

महापालिका प्रशासन कारवाईला गेल्यावर बहुतेक वेळा, राजकीय हस्तक्षेप होते.
अधिकारी कारवाईला गेल्यावर कोणाचाच फोन घेवी नका? कारवाई थांबावी यासाठी कोणी फोन करु नका?
आमच्या कोणाचा फोन आला तरी घेवू नका? शहरातील रस्ते अतिक्रमण मुक्त झाले पाहिजेत
यासाठी महापालिका प्रशासनाने काम केले पाहिजे. याचा आढावा पुढच्या बैठकीमध्ये घेण्यात येईल. (Murlidhar Mohol On Unauthorized Construction)

मोहोळ यांनी महापालिका प्रशासनाला तत्काळ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Atal Pension Yojana | ज्येष्ठांना 5000 नव्हे 10000 रुपये पेन्शन देणार सरकार, अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्पात करतील घोषणा?

Tomato Price Hike | वेगाने वाढला टोमॅटोचा दर, 100 रुपये किलोवर पोहोचला, जाणून घ्या कधी होणार स्वस्त?

Ajit Pawar NCP Sabha In Baramati | लोकसभा निवडणुकीत लोकसभा पराभव झालेल्या बारामतीत अजित पवार गटाची भव्य सभा होणार

You may have missed