Murlidhar Mohol – Pune PMC News | केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या आदेशानंतर महापालिका प्रशासन ऍक्शन मोडवर; नो हॉकर्स झोनमधील रस्त्यांसह प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश
पुणे : Murlidhar Mohol – Pune PMC News | रस्त्यांच्या कडेला आणि पदपथांवरील अतिक्रमणे काढण्याबाबत केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार मुरलीधर मोहोळ यांनी आदेश देताच महापालिका प्रशासन कामाला लागले आहे. नो हॉकर्स झोनमधील ४६ रस्त्यांसह वर्दळीच्या रस्त्यांवरील अतिक्रमण आणि अनधिकृत व्यावसायीक हटविण्यासाठी अतिक्रमण विभागासह वॉर्ड ऑफीसर्सला आदेश देण्यात आले असून त्यांना अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल, असे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले (Rajendra Bhosale) यांनी सांगितले.
सहकार तथा नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी महापालिकेमध्ये शहरातील प्रकल्प आणि योजनांबाबतच आढावा घेतला. यावेळी वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणारी अतिक्रमणे हटविण्याचे आदेश प्रशासनाला दिले. एवढेच नव्हे तर कारवाई रोखण्यासाठी कोणत्याही लोकप्रतिनिधीचा फोन आला तरी त्याला प्रतिसाद देउ नका, अशी समजही दिल्याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. (Murlidhar Mohol – Pune PMC News)
यासंदर्भात माहिती देताना महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले, की महापालिका प्रशासनाने शहरातील अनधिकृत हॉटेल्स, पब आणि अन्य आस्थापनांवर कठोर कारवाई सुरू केली आहे. मागील काही दिवसांत साडेचार लाख चौ.फूटांहून अधिकचे बांधकाम आणि शेडस् पाडण्यात आले आहेत. यासोबतच अनधिकृत होर्डींग्जवरील कारवाई देखिल सुरू असून धोकादायक होर्डींग्ज उतरविण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मध्यंतरी मनुष्यबळाची कमतरता होती. मिळकत करातील चाळीस टक्के सवलत देण्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आल्याने तिकडेही कर्मचारी वर्ग केले आहेत. लवकरच हे कर्मचारी पुन्हा अतिक्रमण विभागाकडे देण्यात येतील.
पहिल्या टप्प्यात सर्वसाधारण सभेने निश्चित केलेल्या नो हॉकर्स झोनमधील पदपथ आणि रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यात येतील.
तसेच वर्दळीच्या रस्त्यांवरील व पदपथांवरील बेकायदा व्यावसायीकांना देखिल हटविण्यात येईल.
महापालिकेने परवाना दिलेल्या विक्रेत्यांचे पदपथ विक्रेत धोरणानुसार पुनर्वसन करण्यासाठी काम हाती घेण्यात येईल.
महापालिकेच्या पंधरा क्षेत्रिय कार्यालयांच्या वॉर्ड ऑफीसर्संना त्यांच्या भागातील अतिक्रमणांवर कारवाई करून अहवाल आयुक्त कार्यालयाकडे देण्याचे आदेश दिले आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Tomato Price Hike | वेगाने वाढला टोमॅटोचा दर, 100 रुपये किलोवर पोहोचला, जाणून घ्या कधी होणार स्वस्त?