Murlidhar Mohol Visit Pune Metro Office | नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्र्यांची पुणे मेट्रो कार्यालयाला भेट
पुणे : Murlidhar Mohol Visit Pune Metro Office | पुण्याचे नवनिर्वाचित खासदार आणि नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज पुणे मेट्रो प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी पुणे मेट्रो कार्यालयाला भेट दिली. या बैठकीसाठी विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह हे उपस्थित होते.
या आढावा बैठकीत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी मान्यवरांना प्रकल्पाचा आढावा सादर केला. यावेळी महामेट्रोचे अतुल गाडगीळ (संचालक, कार्य), विनोद अग्रवाल (संचालक, संचालन आणि प्रणाली), डॉ. हेमंत सोनवणे (कार्यकारी संचालक, प्रशासन व जनसंपर्क) आणि महा मेट्रो पुणेचे इतर अधिकारी उपस्थित होते.
अधिक वारंवारितेसह फीडर सेवेची तरतूद, स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्ग, वनाझ ते चांदणी चौक मेट्रो मार्ग आणि रामवाडी ते वाघोली मार्गिकेसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर), पुणे विमानतळावर फीडर सेवांसाठी प्रवेश आणि इतरत्र फीडर सेवांची तरतूद यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर बैठकीत लक्ष केंद्रित करण्यात आले. याव्यतिरिक्त भविष्यात पुणे व पिंपरी चिंचवड शहरात नवीन मेट्रो मार्गांची आवश्यकता भासणार आहे. त्यावर देखील चर्चा झाली. पुणे मेट्रो सध्याच्या फीडर बस सेवेमधून दररोज ५००० प्रवासी प्रवास करत आहेत. अधिकच्या फीडर बससेवेमुळे ही संख्या वाढण्याची अपेक्षा आहे.
या प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, “पुणे शहरात वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. शहरात मेट्रोचे अधिकाधिक मार्ग बांधण्याची गरज आहे. तसेच मेट्रो फिडर सेवा देखील बळकट करण्याची आवश्यकता आहे. पुणे मेट्रोच्या नवीन मार्गाच्या प्रकल्प अहवालांचा पाठपुरावा करण्यात येऊन लवकरात लवकर त्यांना मान्यता देण्यात मी कायम प्रयत्नशील राहील.”
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर म्हणाले, “पुणे मेट्रो प्रकल्प चांगल्या प्रकारे प्रगतीपथावर आहे,
आणि आम्ही कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आणि पुण्यातील नागरिकांसाठी प्रवासाचा एकूण अनुभव सुधारण्यासाठी कटिबद्ध आहोत.
पुणे मेट्रोला सर्वांसाठी पसंतीचे परिवहन साधन बनवणे हे आमचे ध्येय आहे.
पुणे मेट्रो आपल्या प्रवाश्याना पर्यावरण पूरक, स्वस्त, कार्यक्षम आणि आरामदायी प्रवास देत आहे.”
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Hit & Run Case | पुणे हिट अँड रन: ऑनड्युटी असलेल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांना उडवलं,
एकाचा मृत्यू तर एक गंभीर
Rain In Lonavala Khandala | लोणावळा, खंडाळ्यात संततधार; पाऊस, धुके अन् पर्यटकांची गर्दी
Sharad Pawar On Devendra Fadnavis | “फडणवीसांचा सुरुवातीचा काळ मला चांगला वाटला पण आता…”
शरद पवारांचे मोठे विधान