Mutual Funds | आयपीओच्या मार्गावर आता म्युच्युअल फंड, 5 दिवसात खुल्या होत आहेत 10 नवीन फंड ऑफर, गुंतवणुकदारांसाठी मोठी संधी

Mutual-Funds

नवी दिल्ली : Mutual Funds | म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये सध्या आयपीओ बाजारासारख्या जोरदार हालचाली दिसत आहेत. ज्या प्रकारे सातत्याने बाजारात आयपीओ दिसत आहेत, त्याचप्रमाणे म्युच्युअल फंड कंपन्या गुंतवणुकदारांसाठी लागोपाठ नवीन फंड ऑफर घेऊन येत आहेत. या आठवड्यात बाजारात 10 नवीन फंड ऑफर खुल्या होत आहेत. (Mutual Funds)

ACE MF च्या आकड्यानुसार, आठवड्यात 10 नवीन फंड ऑफर सबस्क्रिप्शनसाठी खुल्या होणार आहेत. या ऑफर विविध कॅटेगरीसाठी आहेत, ज्यामुळे गुंतवणुकदारांना आपल्या पसंतीने पर्याय निवडण्याची संधी आहे. लाँच होत असलेल्या एनएफओमध्ये दोन इंडेक्स फंड आणि सेक्टोरल फंड आहे. याशिवाय एक डिव्हिडंड यील्ड, लार्ज आणि मिड कॅप, मल्टी असेट अलोकेशन, मल्टी कॅप, अल्ट्रा शॉर्ट ड्यूरेशन आणि एक ईटीएफ रांगेत आहे.

इंडेक्स फंडमध्ये टाटा निफ्टी200 अल्फा30 इंडेक्स फंड 19 ऑगस्ट म्हणजे आजपासून खुला झाला आहे आणि 2 सप्टेंबरपर्यंत खुला राहणार आहे. अशाच प्रकारे निप्पॉन इंडिया निफ्टी500 इक्वल वेट इंडेक्स फंड 21 ऑगस्टला खुला होईल आणि 4 सप्टेंबरला बंद होईल. सेक्टोरल फंडमध्ये बंधन बीएसई हेल्थकेयर इंडेक्स फंड 21 ऑगस्टला खुला होऊन 3 सप्टेंबरला बंद होईल, तर अ‍ॅक्सिस कंजम्पशन फंड 23 ऑगस्टपासून 6 सप्टेबंरपर्यंत सबस्क्राईब करता येईल.

यूनियन मल्टी असेट अलोकेशन फंडसाठी सबस्क्रिप्शन 20 ऑगस्टपासून सुरूहोईल
आणि 3 सप्टेंबर चालेल. आयटीआय लार्ज अँड मिड कॅप फंड 21 ऑगस्टला खुला होऊन
4 सप्टेंबरला बंद होईल. बडोदा बीएनपी परिबास डिव्हिडेंड यील्ड फंड 22 ऑगस्टला ओपन होईल
आणि 5 सप्टेंबरपर्यंत सबस्क्राईब करता येऊ शकतो.

ग्रो निफ्टी इंडिया डिफेन्स ईटीएफ 22 ऑगस्टपासून 5 सप्टेंबरच्या दरम्यान खुला राहील.
पीजीआयएम इंडिया मल्टी कॅप फंडचे सबस्क्रिप्शन सुद्धा 22 ऑगस्टपासून 5 सप्टेंबरसाठी उपलब्ध असेल. तर फ्रँकलिन इंडिया अल्ट्रा शॉर्ट ड्यूरेशन फंडचे सबस्क्रिप्शन आजपासून सुरू झाले आहे. हा फंड 28 ऑगस्टपर्यंत सबस्क्राईब करता येईल.

या आठवड्यात 7 आयपीओ

आयपीओ बाजाराबाबत बोलायचे तर या आर्थिक वर्षात खुप हालचाली आहेत. या आठवड्यात बाजारात एकुण 7 आयपीओ खुले होणार आहेत, ज्यामध्ये 2 मेनबोर्डवर येत आहेत, तर 5 आयपीओ एसएमई सेगमेंटमध्ये ओपन होत आहेत.

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Shivsena Eknath Shinde Vs NCP Ajit Pawar | “राष्ट्रवादी हा विश्वासघातकी पक्ष” शिंदे गटाच्या आमदाराची टीका; महायुतीत कलगीतुरा रंगला

Amol Balwadkar Foundation | कोथरूडकर वहिनींसाठी खेळ रंगला पैठणीचा! मंगळागौर, पैठणीच्या खेळाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; अमोल बालवडकर फाउंडेशनच्या उपक्रमाने भगिनी गहिवरल्या

Amol Balwadkar Foundation | धागा मायेचा, वीण विश्वासाची…! अमोल बालवडकर यांना हजारो महिलांनी बांधली राखी; अमोल बालवडकर फाउंडेशनच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन

Congress Mohan Joshi | शिवाजीनगर एसटी स्थानक १५ दिवसांत पूर्ववत जागी आणा; अन्यथा मुख्यमंत्र्यांची गाडी अडवू – माजी आमदार मोहन जोशी

Attack On Female Doctor | धक्कादायक: मद्यधुंद रुग्णाची महिला डॉक्टरला मारहाण; मुंबईतील सायन रुग्णालयातील प्रकार

Supriya Sule On Ajit Pawar | “मी भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते, पण…”,
अजित पवारांच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य

You may have missed