Nagpur Crime News | 19 वर्षीय महाविद्यालयीन युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, टपरीवाल्यानं बलात्कार करुन सोडलं; नराधमाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Arrest-In-Rape-Case (1)

नागपूर : Nagpur Crime News | नागपूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील पांचपावली परिसरात एका युवकाने महाविद्यालयीन युवतीवर विवाहाचे आमिष दाखवून अत्याचार केला आहे. आरोपी विवाहित असूनही त्याने पीडितेला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

साहिल ऊर्फ अब्दुल शरीक कुरेशी (Sahil Alias Abdul Shareek Qureshi) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचा विवाह झाला असून, त्याला मुले देखील आहेत. तो नागपूरच्या चारखंभा चौकात पानटपरी चालवतो. असे असूनही त्याने एका 19 वर्षीय महाविद्यालयीन युवतीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. तिला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. आरोपीने एका ट्यूशन समोर तिच्याशी ओळख केली होती. यावेळी त्याने आपले नाव साहिल शर्मा असल्याचे पीडितेला सांगितले होते.

अत्याचारानंतर काही दिवसांनी आरोपीने पीडितेला टाळायला सुरुवात केली. त्याने त्याचा फोनही बंद केला. यामुळे पीडितेने आरोपीचा फोटो दाखवून आजूबाजूच्या परिसरात आरोपीचा शोध घेतला, यावेळी आरोपीचे नाव साहिल नसून अब्दुल असल्याचे समोर आले. यानंतर पीडिता आरोपीच्या घरी गेल्यावर तिला आरोपी विवाहित असल्याचे कळले. यानंतर पीडितेने थेट पोलिस ठाण्यात जाऊन आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी नराधमाला अटक (Arrest In Rape Case) केली आहे.

You may have missed