Nagpur Crime News | मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला वडिलांनी खडसावलं, भर चौकात वडिलांची हत्या, घटनेनंतर आरोपींचे पलायन

Nagpur Crime

नागपूर : Nagpur Crime News | मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला वडिलांनी खडसावल्याने भर चौकातच पित्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. नरेश वालदे (वय-५३) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना बुधवार (दि.२६) दुपारी इमामवाडा पोलीस ठाण्याच्या जाटतरोडी पोलीस चौकीसमोर घडली.

अधिक माहितीनुसार, बुधवारी दुपारी नरेश यांना काही अज्ञात व्यक्तीने भेटण्यासाठी बोलावले होते. ते दुचाकीवरून जाटतरोडी पोलीस चौकीजवळ आले असता मोपेडवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी चौकातच नरेश यांच्यावर खंजीरने हल्ला करून घटनास्थळावरून पलायन केले. नितेश उर्फ नाना मेश्राम आणि ईश्वर उर्फ जॅकी सोनकुवर अशी आरोपींची नावे आहेत.

नाना मेश्राम गेल्या ४ वर्षांपासून नरेश यांच्या मुलीची छेड काढत होता आणि तिला त्रास देत होता. नरेश यांनी मुलीची छेड काढण्यावरुन त्याला विरोध केला. तसेच अनेकदा आरोपीला समजावण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र आरोपींनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. हत्येच्या एक दिवस आधी काही अज्ञातांनी नरेश यांच्या घरावर दगडफेक केली होती. त्याबाबत त्याबाबतची फिर्याद इमामवाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती, मात्र आरोपीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. दरम्यान आता हत्येनंतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

You may have missed