Nagpur Crime News | महाराष्ट्र पुन्हा हादरला! बस चालकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Minor Girl Rape Case

नागपूर : Nagpur Crime News | नागपुरात एका अल्पवयीन मुलीवर बसचालकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने पीडित मुलीला एक दिवस आणि एका रात्रीत तीन शहरे फिरवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून आरोपीला अटक (Arrest) करण्यात आली आहे. (Minor Girl Rape Case)

संदीप कदम (40) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो नागपूर बस डेपोत चालक म्हणून काम करतो. 17 वर्षीय पीडित तरुणी ही आरोपीच्या ओळखीची आहे. घटनेच्या दिवशी शनिवारी (22 मार्च) पीडित मुलगी उमरखेड बसस्थानक परिसरात बसची वाट पाहत होती. या वेळी आरोपी चालक त्याठिकाणी आला. त्याने पीडितेला कुठे जायचे आहे, असे विचारले. यावर तिने नांदेडला जायचे असल्याचे सांगितले.

त्यानंतर आरोपी संदीपने मी तुला नांदेडला सोडतो, असे सांगितले. तो तिला उमरखेडहून नांदेडला घेऊन गेला. उमरखेड ते नांदेड हे जवळपास ८० किलोमीटरचे अंतर आहे. नांदेडमधील काम उरकल्यानंतर आरोपी तिला थेट नागपूरला घेऊन गेला. या दोन्ही शहरांतील अंतर जवळपास पावणे चारशे किलोमीटर आहे. रविवारी (23) पहाटे पाच वाजता आरोपी तिला नागपुरला घेऊन आला. नागपूरला बस पोहचल्यानंतर आरोपी तिला आपल्या खोलीवर घेऊन गेला. याठिकाणी त्याने पीडितेशी जबरदस्ती करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यानंतर तिला नागपूर-सोलापूर या बसने उमरखेडला सोडून दिले.

दरम्यान, मुलगी दिवसभर घरी न आल्याने तिचे कुटुंबीय चिंताग्रस्त झाले होते. त्यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याचे सांगितले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता, पीडित मुलगी उमरखेड येथे आरोपी संदीप कदम याच्यासोबत दिसल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे तपास करत पोलिसांनी आरोपीला उमरखेड बसस्थानकावरून अटक केली. त्याच्यावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासंह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर एसटी प्रशासनाने आरोपीला निलंबित केले आहे.

You may have missed