Nalasopara Crime News | बापाकडून लैंगिक अत्याचार, सततच्या त्रासाला कंटाळून मुलीने सावत्र बापाचं गुप्तांग कापलं

Pune Crime News | Iranian woman driver takes young man for 2 km after argument after accident; Laxminagar police arrest woman driver (Video)

नालासोपारा : Nalasopara Crime News | अश्लिल वर्तन केल्याने मुलीने आपल्या सावत्र बापाचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बापाच्या सततच्या त्रासाला कंटाळून संतापलेल्या मुलीने धारदार सुऱ्याने बापाच्या गुप्तांगावर तसेच त्याच्या शरीरावर इतरत्रही वार करुन त्यास गंभीररित्या जखमी केले. सध्या बापाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना नालासोपारा पूर्व येथील बावशेत पाडा येथे घडली.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. सावत्र बाप आपल्याशी वारंवार अश्लिल वर्तन करतो म्हणून आपण हे कृत्य केल्याची कबुली मुलीने दिली आहे. तर बाप रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे. जमावाने मुलीला हातातील चाकू फेकण्यास सांगून पोलिस तुला न्याय देतील असे आश्वासन दिल्यानंतर मुलीने हातातील चाकू फेकून दिला. त्यानंतर जमावाने जखमी आरोपी बापाला रुग्णालयात दाखल केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नालासोपारा पूर्व येथे असलेल्या संतोषभवन येथील सर्वोदय नगर चाळीत आरोपी बाप आणि मुलगी राहतात. आरोपी रमेश भारतीसोबत मुलीच्या आईने दुसरे लग्न केले आहे. आरोपी रमेश हा त्याच्या सावत्र मुलीवर शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी वारंवार प्रयत्न करत होता.

यावेळीही तसाच प्रकार घडल्यानंतर संतापलेल्या मुलीने आरोपीवर चाकूने वार केला आणि त्याचे गुप्तांग कापले. तसेच त्याच्या शरिराच्या इतरही भागावर तिने चाकूने वार करुन त्यास रक्तबंबाळ केले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली आणि त्या मुलीला ताब्यात घेतले. सध्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून पोलिस पुढील कारवाई करीत आहेत.

You may have missed