Nana Patole | ‘महायुती सरकारने महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेते पद द्यावे’ : नाना पटोले

ऑनलाइन टीम – Nana Patole | महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महाविकास आघाडीला विरोधी पक्ष नेते पद देण्यासंदर्भात चर्चा केली आहे. सरकार त्यावर सकारात्मक विचार करेल अशी अपेक्षा आहे. असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. (Maharashtra Politics)
विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताला पटोले म्हणाले की, विधानसभा अध्यक्षपद बिनविरोध करणे तसेच उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला देणे ही महाराष्ट्राच्या विधिमंडळाची परंपरा आहे. दिल्ली विधानसभेत भाजपाचे फक्त तीन सदस्य असतानाही आम आदमी पक्षाने भाजपाला विरोधी पक्षनेते पद दिले. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन विरोधी पक्ष नेते पद देण्यासंदर्भात चर्चा केली आहे. त्यावर सकारात्मक निर्णयाची अपेखा आहे.
76 लाख मते कशी वाढली याचे उत्तर द्या
पटोले म्हणाले की, मारकडवाडीतील लोकांनी बॅलेटपेपरवरील मतदानासाठी मॉक पोलिंग घेण्याचा निर्धार केला होता पण निवडणूक आयोग, पोलीस आणि प्रशासनाच्या मदतीने सरकारने त्यांची मुस्कटदाबी केली. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. 76 लाख मते कशी वाढली, याचे उत्तर निवडणूक आयोगाला द्यावे लागेल पण ते समाधानकारक उत्तर देत नाहीत. मतांची चोरी करणे हा लोकशाहीचा दिवसाढवळ्या केलेला खून आहे. लोकशाहीमध्ये अशाप्रकारे असंतोष निर्माण झाला असेल तर त्याची दखल घ्यावीच लागेल. विरोधी पक्ष या नात्याने आम्ही सभागृहात व रस्त्यावर जनतेच्या या मागणीसाठी लढू, असे ही पटोले म्हणाले.
सरकार आपल्या मताचे नाही ही जनभावना
पटोले म्हणाले की, राज्यातील जनतेमध्ये नव्या सरकारबद्दल संभ्रम असून हे सरकार आपल्या मताचे नाही ही जनभावना तीव्र बनली आहे.
मारकडवाडीतच नाही तर राज्यातील प्रत्येक गावाची हीच भावना आहे.
बॅलेट पेपरवरच मतदान घ्यावे अशी मागणी जनतेतून जोर धरत असून ग्रामसभा तसेच ठराव पास करत आहे.
त्यामुळे निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालय या दोन संस्थांनी या जनभावनेची दखल घ्यावी, अशी मागणी देखील पटोले यांनी केली आहे. (Nana Patole)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Daund Leopard Attack | पुणे / दौंड: बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; परिसरात भीतीचे वातावरण
Ozar Pune Accident News | पुणे : मोटारसायकल आणि कारच्या धडकेत एकाचा दुर्दैवी मृत्यू;
अपघातानंतर कार चालकाने पळ काढला