Nana Patole On Badlapur School Girl Incident | ‘बदलापूरची शाळा भाजपा आणि आरएसएसच्या विचारांची असल्याने पोलिसांवर दबाव, सीसीटीव्हीही गायब’, नाना पटोलेंचा गंभीर आरोप
नंदुरबार : Nana Patole On Badlapur School Girl Incident | बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी केली जात आहे. दरम्यान या प्रकरणावरून राजकारण रंगल्याचेही दिसून येत आहे. सत्ताधारी आणि विरोधक या प्रकरणावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत.
दरम्यान बदलापूरची शाळा भाजपा आणि आरएसएसच्या विचारांची असल्याने पोलिसांवर दबाव आहे. शाळेतले सीसीटीव्ही फुटेज गायब केले गेले, असा गंभीर आरोप नाना पटोलेंनी केला आहे.
नाना पटोले म्हणाले, या प्रकरणात पोलीस कारवाई करत नाहीत म्हणून जनतेत आक्रोश निर्माण झाला. हा कुठल्याही राजकारणाचा विषय नाही. सरकार या विषयाचे राजकारण करत आहे. २४ तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या सरकारला वठणीवर आणण्यासाठी बंद पुकारण्यात आला आहे. राज्यात २०१४ ते २०२४ या दहा वर्षात महिला अत्याचाराच्या सुमारे २२ हजार घटना घडल्याचंही, नाना पटोलेंनी म्हटलं आहे. (Nana Patole On Badlapur School Girl Incident)
ते पुढे म्हणाले, महाराष्ट्र हा गुजरातधार्जिणा करण्याचा सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न सुरु आहे.
बदलापूरची शाळा भाजपा आणि आरएसएसच्या विचारांची असल्याने पोलिसांवर दबाव आहे.
शाळेतले सीसीटीव्ही फुटेज गायब केले गेले. मुख्यमंत्री बदलापूरला जाऊन आले आणि त्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला,
असा गंभीर आरोप नाना पटोलेंनी केला आहे.
लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी ४०० कोटीहून अधिक निधीची उधळपट्टी करण्यात आली आहे.
लोकांनी सांगितलं तुमचे दीड हजार नको आमच्या मुली सुरक्षित हव्या आहेत. महाराष्ट्रातील सरकार असंवैधानिक आहे.
सरकारमधले तिघे तिजोरी पोखरत आहेत, अशी जहरी टीकाही नाना पटोलेंनी केली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Mundhwa Pune Crime News | मुंढवा: रस्त्यावरील खड्यातील पाणी अंगावर उडाल्याने कारचालकाला बेदम मारहाण
Pune Rural Police | पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाची पोलीस भरतीची लेखी परिक्षा 24 ऑगस्टला लोणी येथे