Nana Patole On Mahayuti Govt | “महाराजांच्या नावाने मते मागायची, सत्तेत आल्यावर अपमान करायचा ही भाजपची पेशवाई वृत्ती”, विरोधकांचा महायुती सरकारवर हल्लाबोल
मुंबई : Nana Patole On Mahayuti Govt | मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्याने (Malvan Shivaji Maharaj Statue Collapsed) राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. विरोधक महायुती सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत. महाराजांचा अपमान केल्याप्रकरणी महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) आज (दि.१) हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया (Gateway Of India Mumbai) पर्यंत मोर्चा काढत सरकारला जोडे मारो आंदोलन केले. (MVA Jode Maro Andolan)
हुतात्म्यांना अभिवादन करून हा मार्च गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत पोहचला. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
महाराजांचा अपमान करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. छत्रपतींचा पुतळा कोसळल्याने देशभरातील शिवप्रेमींच्या भावना संतप्त असल्याने पंतप्रधानांनी माफी मागितली. पण ही माफी मागतानाही त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती. अशी माफी मान्य नाही.
पुतळा पडला म्हणून माफी मागितली की, भ्रष्टाचार झाला म्हणून माफी मागितली की, भ्रष्टाचाराला पांघरून घालण्यासाठी त्यांनी माफी मागितली. देशाचे प्रवेशद्वार गेट वे ऑफ इंडियाच्या साक्षीने या शिवद्रोह्यांना गेट आऊट ऑफ इंडिया केल्याशिवाय गप्प बसू नका, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले.
भाजपा सरकारने कमिशनखोरी व भ्रष्टाचार करून छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचे पाप केले आहे. मालवणमध्ये शिवरायांचा फक्त पुतळाच पडलेला नाही तर महाराष्ट्र धर्म पायदळी तुडवला व महाराष्ट्राचा अवमानही केला गेला. शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत, खोके सरकारने आमच्या दैवतांचा अपमान केला आहे.
विधानसभा निवडणुकीचा काळ असल्याने पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी माफी मागितली पण हे पाप अक्षम्य आहे.
या चुकीला माफी नाही. राज्यात आणि देशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागायची आणि
सत्तेत आल्यावर त्यांचा अपमान करायचा ही भाजपची पेशवाई वृत्ती आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.
दरम्यान, गेट वे ऑफ इंडियासमोरचा पुतळा अनेक वर्षांपासून आहे,
राज्यातही अनेक भागात असे पुतळे आजही भक्कमपणे उभे आहेत.
मालवणच्या राजकोट किल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे पडला असे विधान मुख्यमंत्र्यांनी केले.
राजकोटच्या किल्यावरील पुतळा कोसळण्याची घटना हा भ्रष्टाचाराचा नमुना आहे.
महाराजांचा पुतळा कोसळल्याने देशातील शिवप्रेमींचा अपमान झाला आहे,
ज्यांच्यामुळे हा पुतळा पडला त्यांचा निषेध करण्यासाठी आंदोलन होते, असे खासदार शरद पवार म्हणाले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Rathod News | मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत?; भूखंड आपल्याच संस्थेला मिळवून दिल्याचा आरोप
Viman Nagar Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद