Nana Patole | ‘…तर मी केंद्रात दोन टर्मला मंत्री राहिलो असतो’, मुख्यमंत्रीपदावरून नाना पटोलेंचे वक्तव्य; म्हणाले – ‘मी अनेक खुर्चा सोडलेला माणूस’

मुंबई : Nana Patole | आगामी विधानसभा निवडणुकीला (Maharashtra Assembly Election 2024) मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण (Face Of CM Maharashtra) असणार याबाबत महायुती आणि महाविकास आघाडीत (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) चर्चा होत आहेत. ही निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात लढायची असून मुख्यमंत्री पदाबाबत महायुतीने संपेन्स ठेवलाआहे. निवडणूक पार पडल्यानंतर बहुमत असल्यास तीनही पक्ष एकत्र बसून निर्णय घेणार आहेत, असे महायुतीतील नेते सांगतात.
महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नावाची चर्चा होती. मात्र त्यानंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून निवडणुकीनंतर ते ठरवले जाईल अशी भूमिका घेतली. त्याला काँग्रेसकडून अनुमोदन देण्यात आलं. त्यानंतर शिर्डीच्या सभेत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसल्याचे सांगितले. त्यामुळे या चर्चेला तूर्तास तरी पूर्णविराम मिळाल्याचे दिसत आहे.
दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मुख्यमंत्री पदाबाबत इच्छुक आहेत का? असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता त्यावर पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मला कोणत्याही पदाची लालसा नाही. सर्वसामान्यांसाठी काम करण्यासाठी मी अनेक खुर्च्या सोडलेला माणूस आहे. माझ्या नशिबात असेल आणि जे मिळेल त्याला जनतेसाठी उपयुक्त करण्याची माझी क्षमता आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
नाना पटोले म्हणाले, मी कधीही खुर्चीची लढाई लढली नाही, कायम जनतेची लढाई लढलीय. त्यामुळे मला फळ काय मिळते यापेक्षा माझा पक्ष कसा मजबूत होईल. महाराष्ट्रातील जनतेला न्याय कसा मिळेल हेच काम मी केले आहे. फळाची चिंता करण्यापेक्षा कर्मावर भरवसा ठेवणारा मी आहे. मला लांगूनचालन करायचे असते तर मी केंद्रात मागच्या आणि आत्ताच्या टर्मलाही मंत्री राहिलो असतो.
जिथं मी खुर्ची घेऊन जनतेसाठी नाही तर स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी काम करत असेन तर ती खुर्ची माझ्या कामाची नाही. मी अनेक खुर्चा सोडलेला माणूस आहे. खुर्चीची लढाई कधीच लढलो नाही. कर्मावर विश्वास आहे. मी माझे राजकीय गुरु विलासराव देशमुख यांचा शिष्य आहे. ते मला सांगायचे, वेळेच्या पहिले आणि नशिबाच्या जास्त काही प्राप्त होत नाही.
माझ्या नशिबात असेल आणि जे मिळेल त्याला जनतेसाठी उपयुक्त करण्याची माझी क्षमता आहे.
आज त्याची काळजी माझ्या डोक्यात न ठेवता महाराष्ट्रातील जनतेला न्याय कसा मिळेल हे माझे स्वप्न आहे.
त्यामुळे जनतेचा कौल आणि उद्याच्या नेतृत्वाचा निर्णय त्याचे आम्ही स्वागत करतो,
असं नाना पटोले यांनी म्हटलं. (Nana Patole)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा