Nana Peth Pune Crime News | जुगारवर कारवाईसाठी पोलीस आल्याचे पाहून दुसर्या मजल्यावरुन मारली उडी! एकाचा मृत्यु, नाना पेठेतील घटना
पुणे : Nana Peth Pune Crime News | नाना पेठेत जुगार खेळला (Gambling Den In Nana Peth) जात असल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस कारवाईला गेले. पोलीस आल्याचे पासून एकाने दुसर्या मजल्यावरुन उडी मारल्याने त्यात त्याचा मृत्यु झाला. एका राजकीय व्यक्तीशी संबंधित हा क्लब असल्याचे सांगितले जाते. पोलिसांना तेथे काहीही मिळाले नाही. (Pune Crime Branch)
https://www.instagram.com/p/DAaW8DWpNr6
ब्रायन रुडॉल्फ गिअर (वय ५२, रा. बाणेर) असे मृत्यु पावलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त अमितेशकुमार (IPS Amitesh Kumar) यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्व अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले. तरीही काही ठिकाणी छुप्या पद्धतीने जुगार, मटका सुरु असतो. गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाला नाना पेठेतील क्राईस्ट चर्चसमोरील लाजवंती कॉम्प्लेक्समध्ये पत्याचा जुगार सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस कारवाईसाठी गेले.
https://www.instagram.com/p/DAaOXAvigL6
तेथे दुसर्या मजल्यावरील दरवाजा बंद होता. पोलिसांनी बेल वाजविली. तेव्हा एकाने सेफ्टी डोअरच्या आतील दरवाजा उघडला. बाहेर पोलीस दिसताच त्याने पुन्हा दरवाजा लावून घेतला. पोलीस आले असा आवाज दिला. त्याचवेळी तेथून खाली काही पडल्याचा आवाज आला. फ्लॅटमधील लोकांनी खाली उडी मारुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यात एक जण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना त्याचा मध्यरात्री मृत्यु झाला.
https://www.instagram.com/p/DAaQKkYiI2A
पोलिसांनी या फ्लॅटची झडती घेतली. परंतु, तेथे पत्ते, जुगाराचे साहित्य असे काहीही मिळाले नाही. फ्लॅटमध्ये कोणीही नव्हते. एका राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तीचा हा क्लब असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने पोलीस कारवाईला गेले होते. या प्रकरणी समर्थ पोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी नोंद केली आहे.
https://www.instagram.com/p/DAaVNfgJ3Az
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Raut Sentenced | विधानसभेच्या तोंडावर संजय राऊतांच्या अडचणीत वाढ;
कोर्टाने सुनावली 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा, जाणून घ्या प्रकरण
Pune Crime News | पुणे : धमकी देऊन बलात्कार करणार्यास पोलिसांनी केली अटक
Amit Shah On Sharad Pawar | ‘शरद पवारांसह त्यांच्या घटक पक्षांना पराभूत करा’,
अमित शहांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले – ‘भाजप असा पक्ष आहे, ज्याने…’