Nanded City Doctors Association | गणेशोत्सव काळात नेत्रचिकित्सा शिबिर संपन्न

पुणे : Nanded City Doctors Association | नांदेड सिटी डॉक्टर्स असोसिएशन आणि कल्चरल कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड सिटी अँफीथिएटर येथे भव्य प्रकारचे संपूर्ण आरोग्य शिबिर पार पडले. गणरायाच्या मंगल आगमनाने अबालवृद्ध, माता भगिनी, पुरुष, नोकरदार, गृहिणी सर्वजण मनसोक्त उत्सवाचा आनंद लुटतात दैनंदिन धावपळीचे काम मानसिक ताण, विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालत निरोगी आयुष्य जगण्यासाठी शरीर संपदा ही उत्तमच हवी. हीच सद्भावना कायम ठेवत डॉ. दूधभाते नेत्रालय आणि रेटिना सेंटर तर्फे या गणेशोत्सवाच्या दिवसात नांदेड सिटी येथे मोफत नेत्रचिकित्सा सेवा दिली गेली. 250 हुन अधिक नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला.
समाजाचे ऋण फेडण्यासाठी फेडण्याची संधी अशा पवित्र दिवशी मिळते याबद्दल डॉ दूधभाते नेत्रालय आणि रेटिना सेंटरचे संस्थापक डॉ. अनिल दूधभाते यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी डॉ. अनिल दूधभाते, डॉ ऋषिकेश दामले, डॉ हरीश गोरे, डॉ. वैशाली गोमसाळे, डॉ. वैशाली गोसावी, डॉ विकास क्षीरसागर,, डॉ. मीनाक्षी रोंगे, सुजित कार्ले, समीर जाधवराव, रुपेश घुले, प्रकाश गोरे, पंकज देडगे, नवले मेडिकल कॉलेजची टीम व सौ. शहा, राहुल देशमुख, राम बेंद्रे, मारुती पदाले, डॉ. राम पडळकर, डॉ. आनंद शिंगाडे, सतीश कुलकर्णी , खेसे, शिरीष पाटील, नाना देशमुख, विकास देडगे, प्रियंका एडके, गणेश मोटे, डॉ.स्नेहल मानपुत्र, डॉ प्रियंका निंबाळकर, डॉ भाग्यश्री साठे, सुरेश शर्मा, सारिका भोसले, अश्विनी पवार, ललित खैरनार, वर्षा देवकर, अनुराधा सिरसागर, माधुरी कांबळे, मंगेश दरेकर, प्रियंका देशमुख, रोहन चौगुले, तन्मय करंजकर, नियती खोपडे, आशा पासलकर उपस्थित होत्या.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा