Nanded Crime News | ‘माझ्या मुलीच्या मागे लागून त्रास का देतो?’, 21 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या

नांदेड: Nanded Crime News | माझ्या मुलीच्या मागे लागून त्रास का देतो म्हणत २१ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. शेख अराफत शेख मेहमूद असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना हदगाव शहरातील खुदबईनगर जिनिंगजवळ शुक्रवार (दि.२१) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली. मुबीनाबी शेख मेहमूद (रा. जिनिंगजवळ खुदबईनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हदगाव पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील एकूण १५ संशयित आरोपींवर गुन्हा दाखल झाला. १० जणांना पोलिसांनी अटक केली, तर ५ जण फरार आहेत. (Murder Case)
मृताच्या आईने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, हदगाव शहरातील खुडबईनगर येथे दोन दिवसांपूर्वी ‘ आमच्या मुलीपासून दूर राहा, अन्यथा तुला ठार मारू’ अशी धमकी दिली होती. दरम्यान शुक्रवारी (दि.२१) सायंकाळी साडेसातच्या सुमारास मृत शेख अराफत घराजवळ बसलेला होता. जेवणासाठी त्याला घरी बोलविल्यानंतर तो घरी जात असताना संशयित आरोपी राम्या संभा काळे, साहेबराव काळे, कृष्णा काळे, जिजाबाई मस्के, प्रियंका काळे, वत्सला काळे, ओमकार काळे यांनी माझ्या मुलास सर्वानी घेरून ‘ माझ्या मुलीच्या मागे लागून त्रास का देतो? आमच्या मुलीवर वाईट नजर का ठेवतो? तुला सांगूनही तू ऐकत का नाहीस? तुला आता आम्ही ठार मारतो’ असे म्ह्णून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
त्यानंतर रम्या, पम्या, साहेबराव काळे, कृष्णा काळे, संजय खानजोडे यांनी चाकू काढून मुलावर वार केले. त्याला वाचविण्याचा प्रयत्नही केला. मात्र इतर त्यास सातत्याने मारहाण करत होते. जखमी अवस्थेत त्यास इतरांच्या मदतीने हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, पुढील उपचारार्थ विष्णूपुरी, नांदेड येथे हलविले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. (Nanded Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
MNS On High Security Number Plate | सरकारने वाहन चालकांकडून खंडणी वसुलीसाठी वापरल्या जाणाऱ्या
‘एच डी नंबर प्लेट’ सक्तीचा फेरविचार करावा; ‘मनसे’ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Kothrud Pune Crime News | शाळेत जातो, असे सांगून 10 वर्षीय मुले घराबाहेर पडली,
घरी न परतल्याने कुटुंबीयांची धावाधाव, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण