Nanded Crime News | तलावात उडी घेत 25 वर्षीय युवकाने संपवलं जीवन, 4 दिवसांपासून होता बेपत्ता

Nanded Crime

नांदेड : Nanded Crime News | माहूर शहरातील श्री देवेश्वर संस्थानच्या पायथ्याशी असलेल्या पौराणिक भोजंती तलावाशेजारी राहणाऱ्या २५ वर्षीय युवकाने तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. भारत रामकृष्ण राठोड असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (दि.१) पहाटे उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार. भारत राठोड हा बुधवार पासून बेपत्ता होता. हा युवक गावातील दुकानात काम करायचा. दरम्यान प्रकृती बरी नसल्याने मागील काही दिवसांपासून तो घरीच होता. त्याला आई-वडील, तीन भाऊ, एक बहिण असा परिवार आहे. तलावाशेजारी राहत असल्याने भारत राठोडने बुधवारीच तलावात उडी घेऊन आत्महत्या केली असावी असा संशय आहे.

या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिल्यानंतर पोहणाऱ्यांच्या मदतीने मृतदेह तलावाबाहेर काढण्यात आला. ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आला. भारत याच्या बहिणीच्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद पोलिस ठाण्यात घेण्यात आली आहे. (Nanded Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या वादावर देवेंद्र फडणवीसांचे महत्वाचे वक्तव्य, म्हणाले…

Union Budget 2025 Updates | कृषी क्षेत्रासाठी ‘पंतप्रधान धनधान्य योजना’,
निर्मला सीतारमण यांची अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा

You may have missed