Nanded Crime News | राजकीय पूर्ववैमन्यस्यातून ठाकरे गटाच्या माजी नगराध्यक्षावर चाकू हल्ला; भाजपच्या पदाधिकाऱ्याने हल्ला केल्याचा आरोप

Kunal Rathod-Nanded Crime News

नांदेड: Nanded Crime News | शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena UBT) माजी नगराध्यक्षावर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. भाजपा युवा मोर्चाच्या माजी तालुकाध्यक्षाने हा हल्ला केल्याचा आरोप माजी नगराध्यक्षाने केला आहे. हा सर्व प्रकार नांदेडमधील हिमायतनगर तालुक्यात घडला आहे. राजकीय पूर्ववैमनस्य आणि राजकीय बदनामी केल्याच्या रागातून ही घटना घडली आहे.

कुणाल राठोड (Kunal Rathod) असं जखमी झालेल्या माजी नगराध्यक्षाचे नाव आहे. दरम्यान दोघेही पूर्वी जिवलग मित्र होते. काही कारणांवरून त्यांच्यात वाद झाला होता. भाजपा युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष राम सूर्यवंशी याने हल्ला करत राठोड यांना जखमी केले. कुणाल राठोड हे शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष आहेत.

मंगळवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास ते आपल्या मित्रासोबत हिमायतनगर शहरातील श्री. परमेश्वर मंदिर मंगल कार्यालयाजवळ चर्चा करत बसले होते. काही वेळानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष राम सूर्यवंशी हा तिथे आला. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर सूर्यवंशी याने चाकूने कुणाल राठोड याच्या पायावर वार केला.

यामध्ये ते जखमी झाले. घटनेनंतर त्यांना उपचारासाठी हिमायतनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते.
मात्र रक्तस्त्राव होत असल्याने त्यांना नांदेडच्या एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar | “माझा दोष फक्त इतकाच आहे की…” अजित पवारांनी जारी केला व्हिडिओ संदेश; जाणून घ्या

Mahavikas Aghadi | ‘आघाडी सरकार आले, तर महिलांना एक लाख’; पृथ्वीराज चव्हाणांनी केलं जाहीर

Supriya Sule On Ajit Pawar Video | अजित पवारांच्या व्हिडिओवर सुप्रिया सुळेंकडून प्रत्युत्तर; म्हणाल्या, “अजित पवारांच्या आरोपांवर…”

You may have missed