Nanded Lok Sabha Bypoll Election Results 2024 | नांदेडमधील लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने मारली बाजी, रविंद्र चव्हाण विजयी

Ravindra Chavan Congress

नांदेड : Nanded Lok Sabha Bypoll Election Results 2024 | विधानसभा निवडणुकीबरोबर (Maharashtra Assembly Election 2024) नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल देखील जाहीर झाला. काँग्रेस खासदार वसंतराव चव्हाण (Vasantrao Chavan) यांच्या निधनानंतर रिक्त झालेली जागा पोटनिवडणुकीत पुन्हा काँग्रेसच्या (Congress) हाती आली आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी भाजपाचे उमेदवार डॉ. संतुक हंबर्डे (Santuk Hambarde) यांचा १४५७ मतांनी पराभव करत विजय मिळवला आहे.

एकीकडे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला, जे काँग्रेससाठी फार धक्कादायक होते. पण नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत विजय हा कुठेतरी काँग्रेससाठी सुखद धक्का मानला जात आहे.

मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात डॉ.संतुक हंबर्डे हे १६ हजार मतांनी आघाडी होते त्यामुळे भाजपाचा विजय हा निश्चित मानला जात होता.
मात्र मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यात गेम पलटला आणि काँग्रेसने पुन्हा ही जागा आपल्याकडे खेचून आणली.
या निकालात रविंद्र चव्हाण यांनी भाजपचे उमेदवार डॉ. संतुक हंबर्डे यांचा १४५७ मताधिक्याने पराभव केला.
रविंद्र चव्हाण यांना ५ लाख ८६७८८ मते मिळाली, तर डॉ.संतुक हंबर्डे यांना ५ लाख ८५३३१ मते मिळाली. (Nanded Lok Sabha Bypoll Election Results 2024)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pravin Darekar On Devendra Fadnavis | “देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील”, भाजप नेत्याचे मोठे वक्तव्य

Maharashtra Assembly Election Results | विधानसभा निवडणूक २०२४; देवेंद्र फडणवीस,
आदिती तटकरे, धनंजय मुंडे, गिरीश महाजन विजयी

Sanjay Raut On Assembly Results | ‘निकालामागे खूप मोठं कारस्थान, लोकशाहीचा कौल वाटत नाही”, संजय राऊत संतापले, म्हणाले – ‘मविआला ७५, १०० जागाही देत नसाल तर…’

Maharashtra Assembly Election Results | महाराष्ट्रात भाजप महायुतीची लाट, मविआची मोठी
पिछेहाट, लाडक्या बहिणींमुळे महायुती सुसाट

You may have missed