Nandgaon Assembly Election 2024 | ‘मला पैशांच्या ऑफर अन् धमक्या’, आमदार सुहास कांदे यांचा भुजबळांबाबत गौप्यस्फोट; म्हणाले…
नाशिक: Nandgaon Assembly Election 2024 | राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) घोषणा झाली आहे. त्यानुसार, येत्या २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. दरम्यान महायुतीतील (Mahayuti) पक्षांकडून उमेदवारी याद्या जाहीर झाल्यानंतर नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. यातूनच अनेकांनी बंडखोरीचे संकेत दिलेले आहेत. नांदगाव विधानसभा मतदारसंघ चर्चेत आहे. (Nandgaon Assembly Election 2024)
या मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी अपक्ष उमेदवारीची घोषणा केली होती. त्यांच्या या भूमिकेवर विद्यमान आमदार सुहास कांदे (Suhas Kande MLA) यांनी सडकून टीका करत भुजबळांबाबत (Chhagan Bhujbal) गौप्यस्फोट केला आहे.
आमदार सुहास कांदे म्हणाले, ” महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात मीच याचिका दाखल केली होती. याचिकेवर अजूनही सुनावणी सुरू आहे. या याचिकेमुळे भुजबळ अडचणीत आहेत. याचिका मागे घेण्यासाठी मला दोन दिवसांपूर्वीच ऑफर देण्यात आली होती.
मला पैशांच्या ऑफर दिल्या गेल्या. धमक्याही दिल्या. पण मी काही बदलणार नाही. मी निवडणुकीतून माघार घेतलेली नाही आणि घेणारही नाही. त्यामुळे भुजबळ माझ्यावर चिडलेले आहेत. माझ्यावर असलेला राग काढण्यासाठी अशा पद्धतीने माझ्यावर आरोप केले जात आहेत, असे कांदे यांनी म्हंटले आहे.
ते पुढे म्हणले, ” महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी मंत्री छगन भुजबळ, समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांना आयुष्यभर जेलमध्ये बसवायचे हाच माझा संकल्प आहे. यापासून मला कुणीही विचलित करू शकणार नाही”, असे कांदे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, समीर भुजबळ यांच्या नांदगाव मतदारसंघातील उमेदवारीवरही त्यांनी भाष्य केले. “भयमुक्त नांदगाव करण्याची भाषा करणे म्हणजे राक्षसाने सत्यनारायणाची पूजा करण्यासारखे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जर परवानगी दिली तर मी येवल्यातूनही (Yeola Assembly Constituency) निवडणूक लढण्यास तयार आहे”, असा इशाराही आमदार सुहास कांदे यांनी यावेळी दिला.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Three Cops Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण