Nandoshi Road Malwadi Pune | नवीन घेतलेल्या टेम्पोमध्ये मुलाचे अडकले बोट; चार तासांच्या थरारानंतर अखेर मुलाची सुटका
पुणे : Nandoshi Road Malwadi Pune | नांदोशी रोडवरील माळवाडी परिसरात असलेल्या विनायक ट्रेडर्स या किराणा दुकानाचे मालक प्रकाश चौधरी यांनी नवीन तीन चाकी टेम्पो घेतला होता. दुकानासमोर टेंपो उभा करुन ठेवलेला होता. येणार्या ग्राहकांना चौधरी पेढे देऊन आनंद व्यक्त करीत होते.
त्याचवेळी अचानक त्यांच्या आनंदावर विरजण पडले. खेळता खेळता त्यांच्या पाच वर्षाचा मुलगा ध्रुव याने टेम्पोमधील पाणी जाण्यासाठी आलेल्या होलमध्ये हात घातला आणि त्याचा हात तेथेच अडून पडला. अगोदर हात ओढून काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हाताला आत जखम होऊन हात सुजला आणि तो आत आणखीच जाम झाला. पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाला बोलविण्यात आले. मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे, विभागीय अग्निशमन अधिकारी सुजित पाटील, पुणे अग्निशमन दलाचे अधिकारी प्रकाश गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलाचा हात काढण्याचा प्रयत्न झाला.
पण, तो निघत नव्हता. जेथे हात अडकला़ त्याच्या बाजूचा पत्रा कापण्याचा प्रयत्न झाला. परंतु, तो कापताना त्याच्या ठिणग्या उडून मुलाच्या हाताला भाजले जात होते. त्यामुळे नेमके काय करावे हे समजत नव्हते. शेवटी मुलाच्या हातावर जाड कापड ठेवून त्या होलच्या बाजूने वर्तुळाकारात टेम्पोचा पत्रा कापण्यात आला.
जवळपास चार तासांच्या प्रयत्नानंतर होलमध्ये अडकलेला भाग बाजूला काढण्यात आला.
पण, मुलाचा हात अजूनही त्या होल मध्ये अडकलेला होता.
त्याला तसेच त्या होलसह रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी ध्रुववर औषधोपचार केले.
त्यानंतर हळु हळु मुलाच्या हातावरील सुज कमी झाली
आणि काही तासांनी त्या होलमधुन मुलाचा हात बाहेर आला.
अग्निशमन दलाचे अधिकारी आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांने अखेर ७ तासानंतर ध्रुवचा हात बाहेर आला.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा