Narayan Rane – Mahavikas Aghadi | पोलिसांसमोरच नारायण राणेंची मविआच्या कार्यकर्त्यांना धमकी, म्हणाले – “एकेकाला घरात घुसून मारून टाकीन…”

सिंधुदुर्ग : Narayan Rane – Mahavikas Aghadi | मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा (Malvan Shivaji Maharaj Statue) कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. यावरून राज्यभरात संतापाची लाट आहे. महाविकास आघाडीचे नेते सत्ताधाऱ्यांवर टीका करताना दिसत आहेत. शिवपुतळा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आज मालवण शहरात महाविकास आघाडीच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात येत असून मालवण बंदची (Malvan Band) देखील हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये मालवण मधील अनेक व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक यांनी सहभाग दर्शवत दुकाने बंद ठेवली आहेत.
दरम्यान आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राजकोट किल्ल्यावर आज दौरा केला. याचकाळात खासदार नारायण राणेही तिथे पोहोचल्याने दोन्ही समर्थकांत राडा झाला. योगायोगाने हे दोन्ही नेते एकाचवेळी किल्ल्यावर पोहोचल्याने गोंधळ उडाला. आदित्य ठाकरे आधी पोहोचल्याने नारायण राणे यांना अडवून ठेवण्यात आलं. त्यामुळे समर्थकांनी पोलिसांविरोधात निदर्शने केली. तसंच, आदित्य ठाकरे यांच्याविरोधातही घोषणाबाजी केली.
दरम्यान राणेंनी पोलिसांशीही हुज्जत घातली. ते पोलिसांना म्हणाले, ” पोलिसांना महाविकास आघाडीला सहकार्य करायचं असेल तर करा. पण यापुढे आमच्या जिल्ह्यात तुम्हाला असहकार्य असेल. तुम्ही त्यांना येऊद्यात. तुम्ही त्यांना आमच्या अंगावर जायला परवानगी द्या. मी बघतो. घरात घुसून एकेकाला मारून टाकीन. सोडणार नाही”, अशी उघड धमकीच नारायण राणेंनी दिली.
आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकोट किल्ल्याला भेट दिली. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve), जयंत पाटील (Jayant Patil), माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांचा समावेश आहे.
मात्र, याचवेळी भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे आणि नितेश राणेही त्या ठिकाणी आले.
त्यामुळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि भाजपाचे कार्यकर्ते आमने-सामने आले.
यावेळी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे पाहायला मिळाले. (Narayan Rane – Mahavikas Aghadi)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Gaikwad On Badlapur Case | बदलापूर प्रकरणावरून शिंदे गटाच्या नेत्याचे अजब विधान, म्हणाले –
“आता काय मुख्यमंत्री शाळेत जाऊन पहारा देतील का?”
Kondhwa To Delhi Samajik Nyay Yatra | ‘कोंढवा ते दिल्ली’ सामाजिक न्याय पदयात्रा 1 सप्टेंबर पासून