Narhe Pune Crime News | दारु पिऊन त्रास देणार्या नवर्याचा चाकूने भोसकून खून; नर्हेमधील घटना
पुणे : Narhe Pune Crime News | दारू पिऊन सतत त्रास देणार्या नवर्याचा चाकूने भोसकून खून करण्याची घटना नर्हे येथे घडली. कृपा देवसिंग बिस्ता (वय ४६, रा. स्वप्नपूर्ती रेसिडेन्सी, नर्हे) असे खून झालेल्याचे पतीचे नाव आहे (Wife Kill Husband). सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police) त्याची पत्नी हिरा कृपा बिस्ता (वय ४२) हिला अटक केली आहे. (Murder In Narhe Pune)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही पतीपत्नी नर्हे येथील स्वप्नपूर्ती रेसिडेन्सी या इमारतीच्या पार्किंगमध्ये रहात होते. ते मुळचे नेपाळचे आहेत. कृपा बिस्ता हा सुरक्षारक्षक म्हणून काम पहात होता. कृपा बिस्ता याला दारुचे व्यसन होते. दारु पिल्यानंतर तो कायम पत्नीशी वाद घालत असे. तिला मारहाण करीत असत. त्याच्या सततच्या त्रासाला हिरा बिस्ता कंटाळली होती.
कृपा बिस्ता हा रविवारी दारु पिऊन आला. दारुच्या नशेत त्याने हिराशी वाद घालण्यास सुरुवात केली. तिला मारहाण करु लागला. तेव्हा रागाच्या भरात हिरा हिने घरातील चाकूने कृपाच्या पोटात वार केला. त्यात कृपा याचा जागीच मृत्यु झाला. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर (PI Raghavendra Kshirsagar) व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हिरा बिस्ता हिला अटक केली आहे. (Narhe Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
