Nashik Crime News | विधवा महिलेचा जीव घेतला अन् झाडाला दोर लावून स्वतःलाही संपवले; नाशिक शहरात खळबळ

Immoral Relationship-Murder

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – Nashik Crime News | सिन्नरच्या माळेगाव येथील हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीत एकाच ठिकाणी कामावर असलेल्या विधवा महिलेच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केल्यानंतर संशयित आरोपीने शेतात कडुनिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. प्रेम संबंधातून ही खळबळजनक घटना घडल्याचे समोर आली आहे.

शिल्पा अमोल पवार (२८, रा. मापारवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. तर महेंद्र सखाहरी रणशेवरे (48, रा. गोंदे, ता. सिन्नर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. शिल्पा अमोल पवार आणि महेंद्र सखाहरी रणशेवरे हे दोघेही माळेगाव औद्योगिक वसाहतीतील हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीत कंत्राटी पद्धतीने कामावर होते. या महिलेला १० आणि ८ वर्षांची दोन मुले आहेत. तर रणशेवरे यांनाही एक मुलगा, मुलगी आहे. रविवारी दोघेही कंपनीत कामावर होते. सुरक्षारक्षक कॅबिनच्या शेजारी असलेल्या इलेक्ट्रिक केबिनच्या पाठीमागे निर्जनस्थळी हे दोघेही रविवारी सकाळी सोबत जाताना सीसीटीव्हीत कैद झाले.

कॅबिनच्या पाठीमागच्या बाजूला सीसीटीव्ही नसल्याची संधी साधून रणशेवरे याने शिल्पा पवार हिच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करत तिची हत्या केली. त्यानंतर कंपनीतून गेट पास न घेताच सुरक्षा भिंतीवरून उडी मारून तो घरी आला. गदी येथे त्याने श्रीघर रणशवरे यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

You may have missed