Nawab Malik In Jan Sanman Yatra | नवाब मलिक जनसन्मान यात्रेत सहभागी; फडणवीसांचा सल्ला अजित पवारांनी धुडकावला, म्हणाले – “अल्पसंख्यांकांवर आम्ही कधीही अन्याय…”
मुंबई: Nawab Malik In Jan Sanman Yatra | आगामी विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) तयारी सर्वच पक्षांकडून सुरु केलेली आहे. दरम्यान नेत्यांनी सभा, बैठका, मेळावे, गाव-भेटी दौरे सुरु केलेले आहेत. इच्छुक मतदारसंघात फिरताना दिसत आहेत. लोकसभेप्रमाणेच आता विधानसभेलाही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) अशी लढत पाहायला मिळणार आहे. (Nawab Malik In Jan Sanman Yatra)
दरम्यान महायुतीत अजित पवारांना (Ajit Pawar) सहभागी करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांना महायुतीत सामील करण्यावरुन आक्षेप नोंदवत टोकाचा विरोध केला होता.
“नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे योग्य होणार नाही असं आमचं स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे हा सर्वस्वी आपला निर्णय आहे. हे मान्यच आहे परंतु त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही याचा विचारही प्रत्येक घटकपक्षाला करावाच लागत असतो”, असं म्हणत नवाब मलिकांना महायुतीपासून दूर ठेवा असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले होते.
मात्र राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेच्या मंचावर नवाब मलिक दिसल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला धुडकावून लावला आहे. नवाब मलिक यांची कन्या सना नवाब मलिक यांना पक्षाचा प्रवक्ता म्हणून अजित पवार यांनी मोठी घोषणा देखील केली. त्यामुळे आगामी काळात महायुतीत आणखी धुसफूस पाहायला मिळू शकते.
जनसन्मान यात्रेत बोलताना अजित पवार म्हणाले,
“लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान विरोधकांनी अल्पसंख्यांकांबाबत अनेक खोट्या गोष्टी सांगितल्या.
सीएए, एनआरसीबद्दल फेक नरेटिव्ह निर्माण केले. हे फक्त परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी आहे.
वक्फ बोर्डाबाबत अल्पसंख्यांकांवर आम्ही कधीही अन्याय होऊ देणार नाही,” असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Water Supply | पुणेकरांनो पाणी जपून वापरा; गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद